गोवा विद्यापिठाची शैक्षणिक पात्रता घसरतेय?

यंदाचा क्रमांक १०० बाहेर

साहिल नारुलकर | प्रतिनिधी

नॅशनल इन्स्टिट्यूशन रँकिंग फ्रेमवर्कच्या मानांकनात गोवा विद्यापीठ सर्वोत्तम १०० क्रमांकाच्या बाहेर गेलीए. यंदा गोवा विद्यापिठाचा समावेश क्रमांक १०० ते १५० च्या गटात झालाय. नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्ककडून यंदा जाहिर केलेल्या मानांकनातून ही माहिती समोर आलीए

नॅशनल इन्स्टिट्यूशन रँकिंग फ्रेमवर्क म्हणजे काय?

नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क ही केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून उच्च शिक्षण संस्थांचे मानांकन करण्यासाठी स्वीकारलेली एक पद्धत आहे. 29 सप्टेंबर २०१५ रोजी स्थापित केलेल्या या पध्दतीत उच्च शिक्षण संस्थांचे विकासाचे मानांकन दरवर्षी जाहिर केले जाते. विद्यापीठ आणि महाविद्यालये, अभियांत्रिकी संस्था, व्यवस्थापन संस्था, औषधनिर्माणशास्त्र संस्था आणि वास्तुविद्या संस्था जसे त्यांच्या कार्यक्षेत्रांवर अवलंबून वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांसाठी स्वतंत्र रँकिंग या माध्यमातून दिले जातेय. यंदाही ‘एनफआरएफ’कडून भारतातील विविध उच्च शैक्षणिक संस्थांची रँकिंग जारी करण्यात आली. त्यांनी जारी केलेल्या रँकिंगनूसार गोवा विद्यापीठ सर्वोत्तम १०० क्रमांकाच्या बाहेर गेलंय. क्रमांक १०० ते १५० च्या गटात गोवा विद्यापिठाचा समावेश झालाय.

गोवा विद्यापिठाची कामगिरी


दरम्यान मागिल ६ वर्षांची आकडेवारी पाहता. २०१८ मध्ये गोवा विद्यापिठाला ६८ वा क्रमांक प्राप्त झाला होता. २०१९ मध्ये गोवा विद्यापीठ ९३ व्या क्रमांकावर गेलंय. २०२० मध्ये पुन्हा ८१ वा क्रमांक प्राप्त केलाय. २०२१ गोवा विद्यापीठाला ९६ वा क्रमांक प्राप्त झालाय. तर २०२२ आणि २०२३ या वर्षांत गोवा विद्यापीठ सर्वोत्तम १०० क्रमांकातून बाहेर गेलंय. यंदा यंदा गोवा विद्यापिठाचा समावेश क्रमांक १०० ते १५० च्या गटात झालाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!