गोवा स्वंयपूर्णतेच्या दिशेने -मुख्यमंत्री

नवनियुक्त स्वयंमित्र,पर्यवेक्षकांसाठी आयोजित दिशानिर्देशन प्रशिक्षण कार्यक्रमात प्रतिपादन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या आत्मनिर्भरतेच्या पैलूवर जोर देताना सरकारी कर्मचारी आणि खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळे आणि सहकार्यामुळे राज्याचं निश्चित केलेलं आत्मनिर्भरतेचं उद्दिष्ट गाठण्याच्या मार्गाने वाटचाल करत आहे, असं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले. आज पर्वरी येथील सचिवालयातील परिषदगृहात नवनियुक्त स्वयंमित्र आणि पर्यवेक्षकांसाठी आयोजित केलेल्या दिशानिर्देशन प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी  मुख्य सचिव आय.ए.एस परिमल राय, आय.ए.एस अशोक कुमार आणि  आय.ए.एस पुनीत कुमार गोयल, सरकारचे सचिव आदी उपस्थित होते.

हेही वाचाः CORONA UPDATE | राज्यात नव्या कोविडबाधितांचा आकडा किंचित वाढला

फलोत्पादन महामंडळाकडून पहिल्यांदाच देशाच्या इतर भागात तीन टन मिरची निर्यात

सरकारने आत्मनिर्भरतेसंबंधी लोकांना प्रवृत्त करण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागात स्वयंमित्र नियुक्त केलेत. फलोत्पादन महामंडळाने पहिल्यांदाच देशाच्या इतर भागात तीन टन मिरची निर्यात केली आहे, असं मुख्यमंत्र्यांनी बोलताना सांगितलं.

कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, महिला व बाल विकास, समाज कल्याण, ग्रामविकास, आदिवासी कल्याण, कौशल्य विकास व उद्योजकता, पंचायत, उद्योग, आरोग्य, हस्तकला खात्यांतील अधिकाऱ्यांनी त्यांच्या खात्याच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!