‘गोवा टुरिझम पॉलिसी 2020’ला मंत्रिमंडळाची मंजुरी
वाढीव वीजबिलांसाठी वन टाइम सेटलमेंट योजना जाहीर. मंत्रिमंडळानं केला जलस्रोत खात्याच्या कंत्राट निविदा पद्धतीतीतही बदल.

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : गोवा सरकारनं ‘गोवा टुरिझम पॉलिसी 2020’ला मंजुरी दिलीय. त्याचबरोबर कन्वेन्शन सेंटर उभारण्यासाठी 98 हजार स्क्वेअर मीटर जमीन निश्चित केल्याची घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली.
कन्वेन्शन सेंटर उभारण्यासाठी 98 हजार स्क्वेअर मीटर जमीन इन्फोटेक कॉर्पोरेशन ऑफ गोवाकडून अर्थ खात्याकडे हस्तांतरित करण्यात आली. हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या माध्यमातून (पीपीपी) पूर्णत्वास नेला जाणार आहे.
मंत्रिमंडळानं जलस्रोत खात्याच्या कंत्राट निविदा पद्धतीतही बदल केला असून यामुळं स्थानिक कंत्राटदारांना अधिक वाव मिळणार आहे.
राज्य सरकारनं वाढीव वीजबिलांसाठी वन टाइम सेटलमेंट योजना जाहीर केली असून याचा लाभ सर्व वीज ग्राहकांना मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.