गोव्यात लसीकरणाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद !

मंगळवारी सर्वाधिक 23,036 नागरीकांचं लसीकरण ; 'सीएम'नी मानले आभार !

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याचं आता सिध्द होतंय. त्यातच नव्या डेल्टा प्लसचा धोका वाढल्यानं लसीकरणासाठी नागरीकांची सकारात्मक मानसिकता तयार होतेय. याचंच प्रतिबिंब गोव्यात मंगळवारच्या लसीकरणाच्या आकडयात पाहायला मिळालं. एका दिवसात तब्बत 23,036 इतकं लसीकरण झालं. तसं पाहीलं तर गोव्यासारख्या छोटया राज्यासाठी हा आकडा खुप मोठा आहे. मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांच्या प्रोत्साहनात्मक नेतृत्वामुळंही या लसीकरण मोहिमेला अधिक गती मिळाल्याचं मानलं जातं. दरम्यान, या विक्रमी संख्येबद्दल ‘सीएम’नी नागरिक तसंच डॉक्टर, नर्स, आरोग्य सेवकांचे आभार मानलेत.

गोवा सरकारनं लसीकरणाच्या बाबतीत सुरवातीपासूनच खुप प्रभावी यंत्रणा उभी केलीय. अन्य राज्यातला बोगस लसीकरणापासून ते केंद्रावर होणा-या धावपळीच्या घटना पाहता गोव्यात खुप चांगल्या पध्दतीनं ही यंत्रणा राबवण्यात येत आहे. मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी यात स्वत : पुढाकार घेतल्यानं लसीकरणाला चांगलीच गती मिळालीय. लसीकरणाबाबतचे गैरसमज दुर करण्यासाठीही सातत्यानं प्रबोधन करण्यात येतंय. त्यामुळं लसीकरणाला नागरीकांचाही आता चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळंच काल मंगळवारी एका दिवसातल्या विक्रमी लसीकरणाची संख्या पार झाली.

दरम्यान, आता लसीचे दोन डोस घेतलेल्यांना गोव्यात थेट प्रवेशाची घोषणा मुख्यमंत्री डाॅ. सावंत यांनी केल्यामुळं पर्यटनासह अन्य व्यवसायालाही चांगले दिवस येतील. या एकुण प्रक्रीयेत लसीचे दोन डोस महत्वाचे असल्यामुळं आता गोव्यातील नागरीकही लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!