मानव-वन्य प्राण्यामधला संघर्ष टाळण्यासाठी 100 नव्या जलसाठ्यांची निर्मिती

मुख्यमंत्र्यांची घोषणा; राज्य वन विभाग जंगलात पाच लाख फळांच्या झाडांची लागवड करणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः वन्य प्राण्यांसाठी राज्याच्या जंगलात शंभर नवीन जलसाठे तयार करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी गोवा शनिवारी जाहीर केलीये. तसंच राज्य वन विभाग जंगलात पाच लाख फळांची झाडे ही लावणार आहे, असं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ संदेशात म्हटलंय.

हेही वाचाः 65 मच्छिमारांना मिळाली नुकसान भरपाई

मानव वन्य प्राण्यांमधला संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्न

मानव-वन्य प्राणी संघर्षामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकारने 10 लाख रुपयांची भरपाई दिली आहे. जंगलातील पाण्याचे साठे वाढविण्याची तसंच फळे देणाऱ्या झाडांची संख्या वाढविण्याची राज्य सरकारची योजना म्हणजे मानव-वन्य प्राण्यांमधला संघर्ष कमी करण्याच्या पुढाकाराचा एक भाग आहे, असं मुख्यमंत्री म्हणालेत.

हेही वाचाः 57 लाख 75 हजाराचे सोने ‘दाबोळी’वरून जप्त

250 निसर्ग मार्गदर्शक, 50 वैद्य मित्र

जंगलातील समृद्ध जैवविविधतेबद्दल लोकांना माहिती देण्यासाठी अडीचशे तरुणांना निसर्गाचे मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षण देण्यात आलं आहे. 50 वैद्य मित्र आहेत, जे आपल्या जंगलात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या औषधी वनस्पतींची कापणी करून ते साठवतील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

हेही वाचाः राज्यात शोकाकुल वातावरण; भाजप टीका उत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटनात व्यस्त

जंगलांबद्दल जागरुकता निर्माण करण्यावर भर

राज्य सरकार जंगलांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी बर्ड फेस्टिव्हल, टर्टल कन्व्हर्सेशन इव्हेंट आणि इतर विशेष कार्यक्रमांचं आयोजन करतंय. तसंच जैव-विविधता उद्यानांच्या माध्यमातून पर्यावरण पर्यटनाला चालना देण्यात आली आहे, तर हरवळे (उत्तर गोवा) आणि धारबांदोडा (दक्षिण गोवा) येथेही नवीन नर्सरी सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!