सत्तरीवाल्यांसाठी खुशखबर! सरकारी कार्यालयातील हेलपाटे होणार बंद

Goan Varta Live | प्रतिनिधी
वाळपईः सरकारी कार्यालयातील कामं कशी चालतात हे आपल्या सर्वांना ठाऊक आहेच. एखादा दाखला जर मिळवायचा झाला तर हेलपाटे घालण्याची तयारी ठेवावीच लागते. ज्येष्ठ नागरिकांची होणारी फरफट तर विचारूच नका. वेगवेगळ्या प्रकारचे दाखले प्राप्त करण्यासाठी येणाऱ्या सर्वसामान्यांना दिलासा देणारी अशी बातमी आहे. कारण, सत्तरीवाल्यांना या सर्वांतून काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
या केंद्राच्या माध्यमातून सत्तरी तालुक्यातील नागरिकांना चांगल्या प्रकारची सुविधा निर्माण झालेली आहे. अशाच प्रकारचे केंद्र प्रत्येक पंचायत क्षेत्रात सुरू झाल्यास ग्रामीण भागातील जनतेला त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होईल.
-आरोग्यमंत्री विश्वजित राणे
कसा होणार फायदा
नागरिकांना सुलभपणं सुविधा मिळाव्यात या हेतूनं केंद्र सरकारनं सीएससी केंद्रांची स्थापना करून त्यामार्फत विविध दाखले उपलब्ध करण्याची सोय केलीय. अशाच प्रकारच्या सीएससी केंद्राचं सत्तरी तालुक्यातील वाळपई शहरात उद्घाटन करण्यात आलंय. आरोग्यमंत्री तथा स्थानिक आमदार विश्वजीत राणेंच्या हस्ते या केंद्राचं उद्घाटन करण्यात आलंय. वाळपईतील राणे कॉम्प्लेक्समध्ये पराग खाडिलकर यांनी ही सुविधा देण्यासाठी पुढाकार घेतलाय. रहिवासी दाखले, पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, उत्पन्नाचा दाखला असे विविध प्रकारचे दाखले या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.
हेही वाचा
विजय सरदेसाईंचं शस्त्रपूजन नाही पाहिलं तर काय पाहिलं?