१८ जून रोजी राज्यात गोवा क्रांती दिवस समारंभ

सर्वसामान्यांसह इतर कोणत्याही अतिथीसाठी हा कार्यक्रम खुला नाही

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः गोवा सरकारतर्फे १८ जून रोजी सकाळी ८.४५ वाजता गोवा क्रांती दिन साजरा करण्यात येणार आहे.

हेही वाचाः बँक ग्राहकांना झटका; ‘एटीएम’मधून पैसे काढण्याच्या नियमात बदल

पणजीतील आझाद मैदानावर कार्यक्रम

पणजीतील आझाद मैदानावरील हुतात्मा स्मारकावर आयोजित कार्यक्रमात गोव्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत राज्यातील लोकांच्यावतीने हुतात्म्यांना आदरांजली वाहतील.

कोविड नियमावलीचं पालन करून कार्यक्रम

कोविड-१९ महामारीमुळे सोशल डिस्टन्सिंग तसंच इतर कोविड नियमावलीचं पालन करून कार्यक्रम संपन्न होणार आहे. सर्वसामान्यांसह इतर कोणत्याही अतिथीसाठी हा कार्यक्रम खुला नसेल. गोवा स्वातंत्र्य सैनिक संघटना आणि शालेय मुलांनाही या समारंभात सहभागी होण्याची परवानगी नाही. 

हेही वाचाः गोवा विमानतळावर ‘आयसीएमआर’ने मंजूर केलेल्या चाचण्यांना मान्यता

मडगावातील लोहिया मैदानावर कार्यक्रम

मडगाव येथील लोहिया मैदानावरील कार्यक्रमास उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर अध्यक्षस्थानी उपस्थित राहतील. हा कार्यक्रम फातोर्डा मडगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभाग ८,  मडगाव नगरपालिका आणि अग्निशमन तसंच आपत्कालीन सेवा संचालनालयाच्या समन्वयाने दक्षिण गोवा जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आयोजित करण्यात येईल.

फोंड्यातील क्रांती मैदानावर कार्यक्रम

फोंडा येथील क्रांती मैदानावरील कार्यक्रमास कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे अध्यक्षस्थानी उपस्थित राहतील, असे माहिती खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!