कोविड १९ लसीकरण गोव्यात सुरू

कोविड १९ लसीकरणासाठी राज्यात ८ केंद्रांची निवड करण्यात आली आहे.

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः राज्यात आज कोविड १९ लसीकरण मोहीम झालीये. कोविड १९ लसीकरणासाठी राज्यात ७ केंद्रांची निवड करण्यात आलीये. या ७ केंद्रांवर एकूण ७०० जणांचं लसीकरण होणार आहे.

कोविड १९ लसीकरण मोहिमेत जीएमसी महत्त्वाचं केंद्र

गोव्यात ७ ठिकाणी कोविड १९ ठिकाणी लसीकरण होणार आहे. या केंद्रांमध्ये जीएमसी, आझिलो म्हापसा, हॉस्पिसियो मडगाव, मडगाव उप-जिल्हा हॉस्पिटल, फोंडा उप-जिल्हा हॉस्पिटल, चिखली उप-जिल्हा या सरकारी हॉस्पिटल्सचा समावेश आहे. त्याचप्रमाणे मणिपाल हॉस्पिटल, दोनापावला आणि हेल्थ वे हॉस्पिटल ओल्ड गोवा ही दोन खासगी हॉस्पिटल्सही कोविड १९ लसीकरणासाठी निवडण्यात आली आहेत. प्रत्येक केंद्रावर १०० जणांचं लसीकरण होणार आहे. म्हणजे गोव्यात ७०० आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण करण्यात येईल. जीएमसी हे गोव्यातील कोविड लसीकरणासाठी महत्त्वाचं केंद्र आहे. हे केंद्र राज्य आणि केंद्रामधला दुवा आहे.

जीएमसीत कसं होणार लसीकरण?

कोविड १९ लसीकरणाच्या पहिल्या दिवशी देशभरात लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. केंद्र सरकारने घालून दिलेल्या नियमांनुसार ही मोहीम सुरू आहे. जीएमसीत लसीकरणासाठी आलेल्यांना वेटिंग एरियामध्ये थांबावं लागेल. त्यानंतर व्हॅक्सिनेशन कम रजिस्ट्रेशन रूम (नोंदणी कक्ष) मध्ये जावं लागेल. जिथे कोविड व्हॅक्सिन सॉफ्टवेअरवर स्वतःची आयडी तपासून पहावी लागेल. लसीकरणासाठी येणार्या प्रत्येकाने स्वतःचं आधार कार्ड सोबत ठेवणं आवश्यक आहे. यानंतर मग त्या व्यक्तीला लस देण्यात येईल. लसीकरणानंतर व्यक्तीला अर्धा तास वेटिंग एरियामध्ये थांबावं लागेल. या वेळेत त्या व्यक्तीचं डॉक्टर्सकडून मॉनिटरिंग केलं जाणार आहे.

आपत्कालीन सेवा

कोविड १९ वरील लस घेतल्यानंतर व्यक्तीला काही त्रास होतोय का हे पाहण्यासाठी तिला अर्धा तास केंद्रात रहावं लागणार आहे. यावेळी आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास तातडीने उपचार करण्यासाठी सर्व तयारी ठेवण्यात आली आहे.

१८ वर्षांखालील मुलांना लस नाही

कोविड १९ लसीकरण मोहिमेत पहिल्या टप्प्यात कोविड वॉरियर्सना लस देण्यात येईल. १८ वर्षांखालील मुलांना ही लस देण्यात येणार नाही.

गोव्यासाठी पहिल्या टप्प्यात कोविशिल्डचे २३ हजार ५०० डोस

गोव्यासाठी पहिल्या टप्प्यात कोविशिल्डचे २३ हजार ५०० डोस पाठवलेत. प्रत्येक केंद्रावर १०० लोकांना लस देण्यात येणार आहेत. गोव्यातील पहिल्या टप्प्यातील लसीकरण संपवायला ४ महिन्यांचा कालावधी लागेल, असं जीएमसीचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी सांगितलंय. सामान्य माणसांसाठी कोविड पोर्टलवर नाव नोंदणी सध्या खुली झालेली नाही. त्यांच्यासाठी पहिल्या टप्प्यातील लसीकरण संपल्यानंतर हो पोर्टल पुन्हा ओपन करण्यात येईल.

गोव्यात कोविशिल्ड लस देणार

कोविड १९ लसीकरण मोहिमेत केंद्राची कोवॅक्सीन आणि कोविशिल्ड या दोन लसींना मान्यता मिळाली आहे. यापैकी गोव्यात कोविशिल्ड लस देण्यात येणार आहे. ही लस गोव्यातील ८ केंद्रांवर येऊन पोहोचली आहे. सर्वात अगोदर कोविड योद्ध्यांना ही लस देण्यात येणार आहे.

जीएमसीचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांची माहिती

जीएमसीत १०० जणांचं लसीकरण होणार असल्याचं, जीएमसीचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी सांगितलंय. कोविड पोर्टलवरील नाव नोंदणीप्रमाणे हे लसीकरण करण्यात येणार आहे. ज्यांचं लसीकरण करायचं आहे त्यांची नाव आली आहेत, असंही डॉ. बांदेकर म्हणालेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणानंतर मोहीम सुरू

आज राज्यासह देशभर कोविड १९ लसीकरण मोहीम होणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संदेशानंतर या मोहिमेचा शुभारंभ करण्यात येईल. गोव्यातही कोविड १९ लसीकरणाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. जीएमसी कोविड १९ लसीकरणासाठी सज्ज असल्याचं, जीएमसीचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी सांगितलंय. गोव्यात ८ हॉस्पिटलमध्ये कोविड १९ लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!