कोविड-19च्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स

मुख्यमंत्री डॉट. प्रमोद सावंतांची माहिती; सरकार लसी खरेदी करण्यासाठी जागतिक निविदा

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

पणजीः कोविड-19 महामारीच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी गोवा सरकारने शुक्रवारी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याची घोषणा केली. तसंच सरकार लसी खरेदी करण्यासाठी जागतिक निविदा काढेल, जेणेकरून राज्यात १८-४४ वयोगटातील लोकांसाठी वॉक-इन लसीकरण सुरू केलं जाऊ शकेल.

हेही वाचाः राजीव गांधीनी घटकराज्य दिलं, भाजपने गोव्याचा संघप्रदेश केलाय

स्पेशल टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री

कोविड-19 च्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी एक स्पेशल टास्क फोर्स तयार करण्यात आली आहे. या टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत असणार आहेत, तर या दलाचे उपाध्यक्ष म्हणून आरोग्यमंत्री विश्वजित राणे काम पाहणार आहेत. 15 सदस्यांच्या या टास्क फोर्समध्ये सरकार आणि खासगी क्षेत्रातील डॉक्टरांचाही समावेश असणार आहे असं मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

हेही वाचाः तरुण तेजपाल प्रकरणातील निकाल दुर्दैवी

डॉ. बांदेकरांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती

गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टरांची आणखी एक तज्ज्ञ समिती स्थापन केली जाईल. ही तज्ज्ञांची समिती आवश्यकतेनुसार उपचार प्रोटोकॉलमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेईल. तिसऱ्या लाटेचा मुलांवर परिणाम होणार असल्याने दोन्ही समित्यांमध्ये बालरोगतज्ज्ञ असतील, असं मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

हेही वाचाः दाबोळीत नौदलाकडून लसीकरण केंद्राची स्थापना

मुलांसाठी 60 खाटांचं विशेष आयसीयू

गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या सुपर स्पेशालिटी ब्लॉकमध्ये मुलांसाठी 60 खाटांचं विशेष अतिदक्षता युनिट (आयसीयू) स्थापन करण्याचा निर्णयही गोवा सरकारने घेतला आहे. खासगी बालरोगतज्ज्ञ आणि सेवांमधून निवृत्त झालेल्यांना सेवा देण्यासाठी आयसीयू घेतले जाईल.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!