अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकास अटक

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो रिपोर्टः काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले होते की लवकरात लवकर राज्यातील गुन्हेगारांना तडीपार करणार. गोव्यातील गुन्हेगारीचा समूळ नाश करणार. मात्र इथे दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतेय. बलात्कार, चोऱ्या, खून, हल्ले इ. प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतेय. वाळपईत एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झालाय. त्यामुळे या भागात एकच खळबळ उडालीये.
हेही वाचाः हणजूण सुरा हल्ला, संशयिताला अटक
अल्पवयीन मुलीचं अपहण; केला बलात्कार
मंगळवारी वाळपई पोलिसांनी एका कारवाई दरम्यान महाराष्ट्रातील दोडामार्ग तालुक्यातील अक्षय नाईक (वय वर्षं ३१) या संशयिताला अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी अटक केलीये. उत्तर गोव्यातील सत्तरी तालुक्याच्या पर्ये गावातील अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपावसून भारतीय दंड संहितेच्या पॉस्को कायद्यांतर्गत वाळपई पोलिसांनी संशयितावर गुन्हा दाखल केला आहे.
मुलीच्या वडिलांनी पोलिसांत दाखल केली तक्रार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १० ऑगस्ट रोजी मुलीच्या वडिलांना पोलिस स्टेशनमध्ये सदर प्रकाराचा उलगडा करताना तक्रार दाखल केली. यानंतर संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुलीच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार संशयिताने १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचं गावातून अपहरण केलं आणि स्वतःच्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
हेही वाचाः गोवा खंडपीठाचे कामकाज १७ ऑगस्ट पासून नव्या इमारतीत सुरू
संशयिताला वाळपई पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी अटक केली आहे. मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे.