शाब्बास पोलिस! या सात जणांचा सुवर्ण पदकानं गौरव

जबरदस्त कामगिरीबद्दल पोलिसांचा गौरव

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : पोलिस खात्यात सर्वोत्तम कामगिरी बजावल्या प्रकरणी ७ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री पोलिस सुवर्ण पदक जाहीर करण्यात आले आहे. शनिवार १९ रोजी गोवा मुक्तिदिनी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत याच्या हस्ते पदकांची वितरण करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त अग्निशामक दलाच्या आणि गृहरक्षक आणि नागरी सेवेत उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या मुख्यमंत्री सुवर्ण पदक वितरण करण्यात येणार आहे.

गोवा पोलिस खात्यातील उपअधीक्षक तथा डिचोली उपविभागीय अधिकारी गुरुदास गावडे, पोलिस निरीक्षक विजयनाथ ए. कवळेकर (कोलवा वाहतूक विभाग), पोलिस उपनिरीक्षक सुरेंद्र एस. कोमरपंत (मडगाव विशेष विभाग), सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुभाष व्ही नाईक (कोकण रेल्वे पोलिस स्थानक), सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक व्हिल्सन फ्रेडी डिसौझा (मोटार विभाग), महिला हवालदार श्रीमती अबिना नोरोन्हा (कळंगुट पोलिस स्थानक) आणि सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दिलीप व्ही. सिनारी (फोंडा वाहतूक विभाग) या सात जणांना पोलिस खात्यात उत्कृष्ट सेवा बजावल्या साठी मुख्यमंत्री सुवर्ण पोलिस पदक जाहीर करण्यात आले आहे. या सर्वांना शनिवार १९ रोजी गोवा मुक्तीदीन कार्यक्रमात पदक बहाल करण्यात येणार आहे.

या व्यतिरिक्त अग्निशामक दलात उत्कृष्ट सेवा बजावल्या मुळे अग्निशामक दलाचे उप अधिकारी अशोक परब, अशोक परब, लिंडींग फायर फायटर दीपक एस. शेटगांवकर आणि वॉचरूम ऑपरेटर सीताराम एल. कामत, या तिघांना मुख्यमंत्री अग्निशामक पदक जाहीर करण्यात आले आहे.

गृह रक्षक आणि नागरी सेवेत उत्कृष्ट सेवा बजावल्या मुळे  संतोष केशव महाले आणि प्रकाश बाबू गावकर  यांना मुख्यमंत्री गृह रक्षक आणि नागरी सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री साहस पुरस्कार राफायल आंतोनियो नोरोन्हा यांना शनिवार १९ रोजी मुक्तिदीनी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत याच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. नोरोन्हा यांनी बॅंकेत दरोडा घालण्यासाठी आलेल्या सशस्त्र दरोडेखोराला पकडले होते. त्यामुळे दुसरा दरोडेखोर जेरबंद झाला व लोकांचे प्राण वाचले. ही घटना ८ डिसेंबर २०१७ रोजी घडली होती.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!