काय चाललंय काय? एप्रिलातही पाऊस पडण्याची शक्यता?

पुढील पाच दिवसात राज्यात बरसणार सरी; गोवा हवामान वेधशाळेचा अंदाज

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः राज्यात पुढील पाच दिवस पावसाच्या हलक्या सरींची तसंच रविवारी ११ एप्रिलला काही ठिकाणी गडगडाटासह पावसाची शक्यता येथील हवामान वेधशाळेने वर्तविलीये. कर्नाटकच्या अंतर्गत भागात ट्रफ निर्माण झालेला असून पर्जन्यवृष्टीला पोषक वातावरण निर्माण झालंय.

राज्यात काही ठिकाणी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता

११ पासून १३ पर्यंत राज्यात काही ठिकाणी गडगडाट आणि विजा चमकून पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. दरम्यान, शुक्रवारी राज्यात सर्वत्र ढगाळ वातावरण होतं. दुपारनंतर काहीसं ऊन आलं. तापमानही वाढलं होतं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!