आपला गोवा बेस्ट डेस्टिनेशनमध्ये 11व्या स्थानी, थोडक्यात टॉप टेन हुकलं

ट्रीप ऍडव्हायजरने 20 प्रेक्षणीय स्थळांची यादी जारी केली आहे.

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

पणजी : ट्रीप एडव्हायजर नावाची एक वेबसाईट आहे. ही वेबसाईट दरवर्षी सर्वोत्कृष्ट डेस्टिनेशन्सची यादी तयार करत असते. यंदाही ही यादी तयार करण्यात आली आहे. यंदा करण्यात आलेल्या यादीत गोव्याला अकरावं स्थान मिळालंय.

पर्यटकांना आकर्षिक करणारं आपलं गोवा यंदा अकराव्या स्थानी आहे. लवकरच गोवा टॉप टेनमध्येही पोहोचेल, असाही विश्वास व्यक्त केला जातो. ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही यादी साकारण्यात आली. या यादीमध्ये 2020 या सालात सर्वात जास्त पसंदी कोणत्या ठिकाणांना पर्यटकांना दिली, याचा शोध घेण्यात आला.

लंडन, फ्रान्स , ग्रीस, इंडोनेशिया, इटली, थायलंड, स्पेन, तुर्कीनंतर आपल्या गोव्याचा नंबर या यादीत लागतोय. महत्त्वाचं म्हणजे दुबईपेक्षा लोकांना गोव्याचा फिरणं जास्त पसंद केलंय. २०२० या वर्षांतली टॉप 20 ठिकाणं या यादीत नमूद करण्यात आली आहेत. करोनामुळे यंदा पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झालाय. त्यातही आपल्या राज्यानं जागतिक प्रेक्षणीय स्थळांच्या यादीत अकरावं स्थान पटकावणं, हे गोयकारांसाठी अभिमानास्पदच आहे.

ट्रीप एडव्हायजने केलेल्या सर्वेक्षणात कोण कोणत्या स्थानी?

2020मधील सर्वोत्कृष्ट प्रेक्षणीय स्थळं

लंडन
London, UK

पॅरीस
Paris, France

क्रेट, ग्रीस
Crete, Greece

बाली, इंडोनेशिया
Bali, Indonesia

रोम इटली
Rome, Italy

फुकेट, थायलंड
Phuket, Thailand

सीसीली, इटली
Sicily, Italy

मजोर्का, बलिआरीक आयर्लंड्स
Majorca, Balearic Islands

बाससीलोना, स्पेन
Barcelona, Spain

इन्स्तांबुल, तुर्की
Istanbul, Turkey

गोवा, भारत
Goa, India

दुबई, संयुक्त अरब राष्ट्र
Dubai, UAE

डोमेनिकन रिपब्लिक
Dominican Republic

बँकॉग, थायलंड
Bangkok, Thailand

हनोई, व्हिएतनाम
Hanoi, Vietnam

क्रुझ रिपब्लिक
Prague, Czech Republic

होई-अन, व्हिएतनाम
Hoi An, Vietnam

होर्ड्स
Rhodes, Dodecanese

क्युबा
Cuba

कम्बोडिया
Siem Reap, Cambodia

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!