डेडलाईन चुकली! 31 जुलैपर्यंत गोव्यात पहिल्या डोसचं १००% लसीकरण झालंच नाही, मग झालं किती ?

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो : टिका उत्सव साजरा करत गोव्यातील कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला होता. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सातत्यानं या लसीकरणाबाबत जनजागृती करत ३१ जुलैपर्यंत कोरोनाच्या पहिल्या डोसचं १०० टक्के लसीकरण गोव्यात करण्याचं ध्येय ठेवलं होतं. सरकारी यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था यांनाही त्यासाठी कामाला लावलं होतं. पण अखेरीस हे ध्येय गाठण्यात सरकारलं अपेक्षित यश आलेलं नाही. 31 जुलैपर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीच्या पहिल्या डोसचं १०० टक्के लसीकरणं गोव्यात झालेलं नसल्याचं समोर आलंय.

किती टक्के झालंय?
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रचंड मोठा फटका बसलेल्या गोव्यात लोकांनी कोरोना संसर्गाची बरीच धास्ती घेतली होती. त्यानंतर लोकांनी कोरोना लसीकरणालाही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. वयाची अटही हळूहळू कमी करण्यात आली. त्यासोबत पालकांसाठी विशेष उपक्रम राबवत गोवा सरकारनं लसीकरणाची मोहीम सुरु केली होती. मात्र या सगळ्यानंतरही 31 जुलैपर्यंत राज्यातील 13 टक्के लोकांनी कोरोना लस न घेतल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा : Video | Covid 19 | Inside Story | नवनव्या कोरोना व्हेरिएंटमुळे प्रगत देशही हतबल
दी हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार, लसीकरणासाठी पात्र असलेल्या 87 टक्के जणांचं गोव्यात लसीकरण पूर्ण झालं आहे. त्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. दर 23 टक्के जनतेला कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आल आहे. डॉ. राजेंद्र बोरकर यांनी पीटीआयला ही माहिती दिली होती. या माहितीवरुन गोव्यात 100 टक्के लसीकरणासाठी ठरवण्यात आलेली 31 जुलैची डेडलाईन चुकली असल्याचं स्पष्ट झालंय.
रुग्णवाढीचा धोका कायम

हेही वाचा : मोठी बातमी! ईदच्या सवलती भोवल्या, केरळमध्ये कोरोना संकट वाढलं
दुसरीकडे कोरोना लसीकरणाचं ध्येय जरी चुकलं असलं तरीही अजूनही अनेक भागात लसीकरण नको म्हणणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. या वर्गाला लसीकरणाचं महत्त्व कसं पटवून द्यायचं, असाही प्रश्न प्रशासनाला पडलाय. अशातच राज्यात कोरोना रुग्णवाढीच वेग मंदावलाय. पण सध्या सार्वजनिक ठिकाणी लोकांची होणारी गर्दी तसेच आठवड्याच्या बाजारमध्ये होणारी लोकांची गर्दी पाहता करोनाचा पुन्हा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही. सध्या लोक कोरोनाचे नियम विसरुन विना मास्क तसेच सामाजिक अंतराचा विसर पडलेला आहे. राजकीय मोर्चा आंदोलने बिनधास्त राज्यात होताना दिसत आहे. राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नियम मोडत आहे. लोकांनीही कोरोनाचे नियम पाळणे सोडून दिले आहे. सॅनिटाईझर वापरही कमी झालेला आहे. राज्यात अजूनही रात्रीचा कफ्यू लागू आहे. तरी रात्रीच्या वेळी लोक मोठ्या बाहेर पडत आहे.
हेही वाचा : कोरोना आणि म्युकरमधून बरा झालेल्या सचिन तुभेची गोष्ट
रविवारची आकडेवारी काय?
राज्यात शनिवारच्या आणि रविावराच्या २४ तासात नव्या ५९ कोरोना सक्रिय रुग्णांची भर पडली. तर एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच मागच्या २४ तासात १०५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या सक्रिय कोरोना रुग्णाची संख्या १०११ वर पोहचली आहे. गेल्या २४ तासात ३ हजार ३३४ चाचण्यांचे अहवाल आरोग्य खात्याकडे आलेत. यातील ५९ जणांना लागण झालीये. यातील ४५ कोरोना रुग्णांना गृह विलगीकरणात पाठविण्यात आले आहे तर १४ कोरोना रुग्णांना डॉक्टरांच्या देखरेखाली ठेवण्यात आले आहे.

कोरोनाने आतापर्यत ३ हजार १४८ लोकांचे बळी गेलेत. आतापर्यत राज्यात एकूण १ लाख ७१ हजार २०५ जणांना लागण झाली आहे. यातील १ लाख ६७ हजार ४६ लोकांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली. तर कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर आता ९७.५७ टक्क्यांवर पोहोचला आहे.