गोव्यात या वर्षी नाईट मार्केटला बंदीच

हडफडे-नागवा पंचायतीने घेतली हरकत

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : हडफडे-नागवा पंचायत क्षेत्रातील दोन नाईट मार्केट यंदाच्या पर्यटन मोसमात बंद राहतील. पंचायतीने या मार्केटना परवानगी देण्यास नकार दिलाय.

पुढील आठवड्यात पंचायतीची बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर सरपंच राजेश मोरजकर यांनी सांगितले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही सॅटर्डे नाईट मार्केट व सॅटर्डे नाईट बाजार सुरू करण्याच्या विरोधात आहोत. मात्र पंचायतीच्या आगामी बैठकीत या संदर्भात अंतिम निर्णय होईल. सॅटर्डे नाईट मार्केटच्या आयोजकांनी पंचायतीकडे परवानगी मागितली असून आम्ही ती बीडीओकडे पाठवली आहे. सरकारने त्यांना परवानगी दिली, तरी आम्ही या मार्केटच्या विरोधात आहोत. मार्केटला परवानगी दिली, तर गर्दी होईल आणि कोरोनाचा फैलाव होईल, जे आम्हाला नको आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!