लॉकडाऊन वाढवणं गरजेचं नाही का?

15 दिवसांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय शक्य

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्यात सोमवार दि. 3 मे पर्यंत जाहीर केलेला लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवावा, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशननं (आयएमए) केलीय. आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Vishwajit Rane) यांनी तर 30 दिवसांच्या लॉकडाऊनची मागणी केलीय. वाढते कोरोना रुग्ण आणि मृतांचा वाढता आकडा पाहता, लॉकडाऊन वाढवणं हाच योग्य पर्याय ठरू शकतो.

CORONA UPDATE | LOCKDOWN | लॉकडाऊनचा कार्यकाळ वाढवा

तेरे पास कोई दुसरा ऑप्शन है..?

कोविडच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील सरकारी नोकरांसाठी राज्य सरकारनं जारी केलेले नियम 15 दिवसांनी वाढवले आहेत. 21 एप्रिलला हे परिपत्रक काढण्यात आलं होतं. त्यानंतर 27 एप्रिलला दुसरं परिपत्रक काढून सरकारनं तीन दिवसांचं लॉकडाऊन केलं. सरकारी कर्मचार्‍यांसाठी लागू असणारे नियम सर्वसामान्यांना लागू होत नाहीत का? तीन दिवसांचं लॉकडाऊन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं का? महाराष्ट्रासारखं राज्य 15 दिवसांनी लॉकडाऊन वाढवतं. कर्नाटकमध्येही लॉकडाऊन लावलं गेलंय. अशा स्थितीत लॉकडाऊन न वाढवता सरकार असा कोणता उपाय अमलात आणणार आहे, जेणेकरून कोरोना आटोक्यात येईल?

अबब! ५० टक्क्यासह पॉझिटिव्हिटीत गोवा देशात पहिला! वाटोळं केलं की ह्यांनी!

रुग्ण वाढले, मृतांचा आकडा आवाक्याबाहेर..!

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या म्हणण्यानुसार, लॉकडाऊन 30 दिवसांचे असायला हवे. व्यावहारिकदृष्ट्या हे शक्य नसले, तरी निदान 15 दिवसांचा ब्रेक घेणं गरजेचं आहे. कोरोना रुग्णवाढीची साखळी तोडायची असेल, तर हा ब्रेक गरजेचाच आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचं (आयएमए) हेच म्हणणं आहे. जे आरोग्यमंत्र्यांना समजतं, जे आयएमएला समजतं, ते सरकारला उमजू नये?

संकेत लॉकडाऊनचेच!

राज्य सरकारनं सरकारी कर्मचार्‍यांसाठीची नियमावली आणखी 15 दिवसांसाठी वाढवून लॉकडाऊन वाढवण्याचेही संकेत दिले आहेत. त्यामुळे सरकार किती दिवसांसाठी लॉकडाऊन वाढवतंय, याबाबत उत्सुकता आहे.

पाहा फेसबुक लाईव्ह…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!