१०० टक्के पहिला डोस पूर्ण झालेलं गोवा देशातील दुसरं राज्य

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांची माहिती; २० टक्के पात्र लोकसंख्येने दुसरा डोस घेतला नाही

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: १०० टक्के पहिला डोस पूर्ण झालेलं गोवा देशातील दुसरं राज्य असल्याचं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घोषित केलं आहे. तसंच २०% पात्र लोकसंख्येने दुसरा डोस घेतला नसल्याचंही ते यावेळी म्हणालेत. हिमाचल प्रदेश हे देशातलं पहिलं राज्य आहे, ज्याने १०० टक्के पात्र नागरिकांना पहिला डोस दिला आहे.

१०० टक्के पहिला डोस पूर्ण

गोव्यात पहिल्या डोससह पात्र नागरिकांचं १०० टक्के लसीकरण पूर्ण झालं आहे. १० टक्के त्रुटी लक्षात घेता पात्र लोक अंदाजे ११.४ टक्के आहेत. मुख्यमंत्री सावंत यांनी एका शासकीय कार्यक्रमाच्या वेळी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. राज्य सरकारने ३१ ऑक्टोबर ही तारीख ठरवली आहे, ज्यात संपूर्ण पात्र लोकसंख्येला पूर्णपणे लसीकरण अपेक्षित आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

२० टक्के पात्र लोकसंख्येने घेतला नाही दुसरा डोस

सुमारे २० टक्के पात्र लोकसंख्येने त्यांचा दुसरा डोस घेतला नसल्याचं समोर आलंय. मी या लोकांना विनंती करतो की कृपया आरोग्य केंद्रांशी संपर्क साधा आणि स्वतःचं लसीकरण करून घ्या, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.

३१ ऑक्टोबरपर्यंत दोन्ही डोससह लसीकरण पूर्ण करण्याचं उद्दिष्ट

राज्य सरकारने ३१ ऑक्टोबर ही तारीख ठरवली आहे, जोपर्यंत राज्यातील प्रत्येक पात्र नागरिकाचं लसीकरण पूर्ण करण्याचं उद्दिष्ट्य समोर आहे. कोविड लसीचा दुसरा डोस ज्यांनी घेतला नसेल त्यांनी तो लवकरात लवकर घ्यावा आणि स्वतःला कोरोनापासून सुरक्षित करावा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

हेही वाचाः गोवा मुक्ती लढ्यात नौदलाची अभिमानास्पद भूमिका

कोविड -१९ चं लसीकरण पूर्ण झाल्यानंतरच पर्यटकांसाठी राज्याच्या सीमा पुन्हा उघडल्या जाण्याचा विचार केला जाईल, असं मुख्यमंत्री म्हणालेत.

हा व्हिडिओ पहाः Doctor Attack | डॉ. तिळवे हल्ला प्रकरणी मुख्य संशयिताला जामीन

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!