गोवा ही प्रयोगशाळा नव्हे; गोव्यावर गोंयकारांनाच राज्य करू द्यावं

काँग्रेसच्या ज्येष्ठ राष्ट्रीय नेत्या अलका लांबा यांचं प्रतिपादन; 'आप'वर साधला निशाणा

श्याम सूर्या नाईक | प्रतिनिधी

वास्कोः गोवा हे राज्य प्रयोग करण्याची प्रयोगशाळा नाही. त्यामुळे गोंयकारांनी बाहेरील लोकांना गोव्यात प्रयोग करण्यासाठी आमंत्रित करू नये. गोव्यावर गोंयकारांनाच राज्य करू द्यावं, असा प्रतिपादन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या अलका लांबा यांनी केलं. त्यांनी अप्रत्यक्षपणे ‘आप’ वर निशाणा साधला.

हेही वाचाः नागझरजवळ अल्टो कारचा अपघात! चालक आश्चर्यकारकरीत्या बचावला

‘आप’ गोंयकारांना मूर्ख बनवतंय

लांबा म्हणाल्या, गोवेकरांना ‘फ्रीबीज’ देऊन मूर्ख बनवलं जात आहे. दिल्ली या राज्याचं प्रशासन हे एक अयशस्वी मॉडेल ठरलंय. कोविडच्या वेळी आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या अनेक मृत्यूसह दिल्ली गेल्या वर्षीपासून त्रस्त आहे, असं लांबा म्हणाल्या. तसंच दिल्लीतील चर्च पाडल्याप्रकरणी केजरीवाल यांच्या वक्तव्यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. आपचे तीन आमदार चर्च पाडण्याचा निर्णय घेणाऱ्या समितीचे सदस्य आहेत. चर्च उद्ध्वस्त होण्यापासून बचावासाठी केजरीवाल यांनी पावलं उचलायला हवी होती. दिल्लीनेही पाहिलं आहे, की दंगलीमुळे बरेच लोक मरण पावलेत आणि केजरीवाल त्याबद्दल काहीही करू शकले नाहीत, असं लांबा म्हणाल्या.

हेही वाचाः १५ दिवसांत विद्यार्थ्यांना इंटरनेट सेवा, स्मार्ट फोन द्या; अन्यथा तीव्र आंदोलन

‘आप’ ही भाजपची बी टीम

‘आप’ ही भाजपची बी टीम असल्याची भूमिका पुन्हा लांबी यांनी पुन्हा व्यक्त केली. केजरीवाल यांनी दिल्लीच्या सर्व प्राथमिकतांकडे दुर्लक्ष केलं आहे. भाजपच्या फंडावर ते सध्या विविध राज्यांचे दौरे करत आहेत, असा आरोप लांबा यांनी केलाय.

हेही वाचाः राज्य नागरी सेवेतील अधिकाऱ्यांना बढती

कोविड महामारीत केजरीवाल यांनी दिल्लीला अर्ध्यावर सोडलंय

‘आप’ ही भाजपाची बी टीम असल्याचं समजल्यानंतर मी ‘आप’चा त्याग केला असल्याचे लांबांनी सांगितलं. ‘आप’ केवळ जाहिरातींवर प्रचंड पैसा खर्च करून प्रसिद्धी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. खरं म्हणजे ‘आप’ला केवळ भाजपच्या विजयाची खोटी साक्ष देण्यासाठी काँग्रेसची मतं वाटून घ्यायची इच्छा आहे. भारताच्या कोणत्याही राज्यातील मुख्यमंत्री इतर राज्यांच्या दौर्‍यावर गुंतलेले नाहीत. या कोविड महामारीच्या वेळी केजरीवाल यांनी राज्याला अर्ध्यावर सोडलंय, असा आरोप लांबा यांनी केलाय.

हा व्हिडिओ पहाः Video | Oppourtunity | Skill Development | ३० कंपन्यांमध्ये दीड हजार जणांची निवड होणार

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!