गोवा दिवाळखोरीच्या दिशेने चाललायः सुदीन ढवळीकर

परिस्थिती सुधारायची असल्यास येत्या निवडणुकीच योग्य पक्षाला निवडणून देणं गरजेचं

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः सध्या गोव्याच्या आर्थिक तसंच इतर खात्यांचा कारभार पाहिल्यास गोवा दिवाळखोरीच्या दिशेने चाललाय असंच म्हणावं लागेल. ही परिस्थिती जर सुधारायची असेल तर येत्या निवडणुकीच योग्य माणसांना आणि योग्य पक्षाला निवडणून देणं महत्त्वाचं आहे, असं मगोपचे ज्येष्ठ नेते तथा मडकईचे आमदार सुदीन ढवळीकर म्हणाले. सभागृहात सरकारच्या आर्थिक आणि सरकारी खात्यांच्या बेशिस्तीचा पंचनामा केल्यानंतर ‘गोवन वार्ता लाईव्ह’शी एक्सक्लुझिव्ह बातचीत करताना ते बोलत होते.

हेही वाचाः गोंयकार राजकीयदृष्ट्या अत्यंत सूज्ञः अ‍ॅड. नरेंद्र सावईकर

3 दिवसीय पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ढवळीकरांनी राज्याच्या ढासळलेल्या आर्थिक स्थितीचं वाभाडं काढलं. त्याचप्रमाणे खर्च करण्यासाठी सरकारकडे पैसेच नसल्याची गोष्टही उघड केलीय. पुढे अर्थसंकल्पातील तरतुदींसाठी मंजूर केलेला निधी तसाच पडून असल्याचं सांगत ढवळीकर आक्रमक झाले. राज्यपालांनी भाषण केलं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की अंधारातून प्रकाशाकडे जा, असत्यातून सत्याकडे जा. मात्र आज इथे जे काही चाललंय ते बरोबर विरुद्ध दिशेने सुरू आहे. आपण उलट चाललोय. यातून आपण फक्त आणि फक्त अशांती मिळवतोय. या सर्व गोष्टींचा विचार करूनच मी आज सरकाची गोची करायची ठरवलं होतं, असं ढवळीकरांनी स्पष्ट केलं.

हेही वाचाः चर्च पाडण्यामागे आम आदमीचं सरकार नाही

सगळा अंधाधुंद कारभार

सरकार कसा कामचुकारपण करतंय हे सांगताना ढवळीकर म्हणाले, बजेटचा उपयोग करावा लागतो. मात्र सरकारने मागच्या अधिवेशनात जे बजेट मान्य करून घेतलं, त्याचं उपयोगच केलेला दिसत नाही. सगळा अंधाधुंद कारभार सुरू आहे. सरकारला जेव्हा यावर प्रश्न केला, तेव्हा त्यांच्याकडे द्यायला उत्तर नव्हतं. हे पैसे जनतेचे आहे. आणि ते कुठे व कसे खर्च होतात हे जनतेला समजलं पाहिजे. माझ्याकडे जेव्हा वाहतूक खातं होतं तेव्हा मी 421 कोटीवर बजेट नेऊन ठेवलं होतं, आता तेच बजेच  200 कोटीवर आलंय. त्यातून बदल केलेल्या कायद्याची अंमलबजावणी झालेलीही दिसत नाही. याचा अर्थ या सरकारला काम करायला नको. आहे त्यात सारवा सारव करायची आहे. या कारभारात निश्चितच अधिकारीदेखील सामील असणार, असे आरोप ढवळीकरांनी केलेत.

हा व्हिडिओ पहाः भारतीय निवडणूक आयोगाच्या बैठकीचा अर्थ काय? विधानसभेची निवडणूक लवकर होणार?

सरकारच्या नकारात्मक धोरणामुळेच संजीवनी साखर कारखाना बंद

संजीवनी सहकारी साखर कारखाना गेली 3 वर्षं बंद आहे आणि तो सरकारच्या नकारात्मक धोरणामुळेच बंद आहे. कारखान्यातील यंत्रसामुग्रीच्या नुतनीकरणासाठी सुरुवातीची अंदाजी किंमत 4 ते 5 कोटी दाखवली गेली. आज सरकारने नरोवा कुंजरोवा करून तिच किंमत 14 ते 15 कोटी दाखवली, जिथे नको होता तिथे पैसे मोडले. त्यामुळे संजीवनीवर आज ही परिस्थिती ओढवळी आहे. 25 कोटींचा प्रकल्प जेव्हा 32 ते 40 कोटी होतो, तेव्हा कुठेतरी भ्रष्टाचार आहे हे सरळ आहे. हा प्रकार जोपर्यंत मुख्यमंत्री प्रकाशात आणत नाही, तोपर्यंत आमची स्थिती अशीच राहणार, असल्याचं ढवळीकरांनी बोलून दाखवलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!