डेल्टा कॉर्पच्या पेडणेतील गेमिंग झोनला गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची अंतिम मंजुरी

डिसेंबर २०२० मध्ये दिली होती तत्वतः मंजुरी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने अलिकडेच मंजूर केलेल्या 7 प्रस्तावांत पेडणे तालुक्यातील धारगळ पंचायत क्षेत्रात मोठ्या पंचतारांकित प्रस्तावांचा समावेश आहे. डेल्टा प्लेजर कॉर्प कंपनी, जी राज्यात कॅसिनो व्यवसाय चालवते त्या कंपनीचे हे प्रकल्प आहेत. या कंपनीच्या पेडणेतील गेमिंग झोनला गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची अंतिम मंजुरी मिळाली आहे. डिसेंबर २०२० मध्ये या प्रकल्पाला तत्वतः मंजुरी देण्यात आली होती.

हेही वाचाः डॉक्टर तिळवे माराहाण प्रकरणी मिनेष नार्वेकरला सशर्त जामीन मंजूर

कोविड महामारीनंतर झालेल्या मंडळाच्या पहिल्या बैठकीत निर्णय

कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर पुनर्रचना झाल्यानंतर मंडळाच्या पहिल्या बैठकीत डेल्टा प्लेजर कॉर्पच्या गेमिंग झोनला गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने हिरवा झेंडा दाखवला. डेल्टा प्लेजर कॉर्प कंपनीकडून सुरू करण्यात येणाऱ्या या गेमिंग झोनमध्ये हॉटेल्स, कन्वेन्शन सेंटर, मल्टीप्लेक्स, इलेक्ट्रॉनिक कॅसिनो, वटर पार्क अशा अनेक सुविधा असणार आहेत, अशी माहिती मिळतेय. डेल्टा कॉर्पचे शेअर्स वाढले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली उद्योगमंत्री विश्वजित राणे आणि औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ग्लेन टिक्लो यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आमच्या आयपीबी बैठकांमध्ये फास्ट ट्रॅक मोडवरील प्रकल्प मंजूर करण्यावर भर देण्यात आला आहे, असं राणे म्हणाले.

हेही वाचाः ‘या’ म्युच्युअल फंड्समध्ये करा गुंतवणूक आणि मुलांच्या शिक्षण खर्चामधून व्हा टेंशन फ्री

पेडणे-धारगळ येथील सुमारे 4 लाख 27,050 चौ. मीटर जागेत विविध प्रकल्प

गोवा गुंतवणूक प्रोत्साहन आणि सुविधा मंडळाकडून प्रारंभिक मान्यता मिळाल्यानंतर डेल्टा कॉर्पने डिसेंबरमध्ये प्रथम आयआर योजना जाहीर केल्या. पेडणे तालुक्यातील धारगळ पंचायत क्षेत्रात सुमारे 4 लाख 27,050 चौ. मीटर जागेत डेल्टा प्लेजर कॉर्प कंपनीतर्फे अनेक प्रकल्प उभारण्याची योजना आहे, ज्यामध्ये हॉटेल्स, कन्वेन्शन सेंटर, मल्टीप्लेक्स, इलेक्ट्रॉनिक कॅसिनो, वटर पार्क अशा अनेक सुविधा असणार आहेत. या विविध प्रकल्पांतून अंदाजे 4 हजार रोजगारसंधी उपलब्ध होतील, असा दावा कंपनीने केला आहे. प्रस्तावित मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अनुषंगाने हे प्रकल्प उभे राहणार आहेत.

जयदेव मोदी यांच्या मालकीची कंपनी

डेल्टा प्लेजर कॉर्प लिमिडेट ही जयदेव मोदी यांची कंपनी आहे. त्या वेळी कंपनीने सांगितले की, हा प्रकल्प गोव्यातील पर्यटन, रोजगार आणि पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी आहे. गोव्याच्या मांडवी नदीतील तीन तरंगते कॅसिनो आणि गोवा तसंच सिक्कीममधील तीन भू-आधारित कॅसिनो चालवणारी डेल्टा कॉर्प ही भारतातील एकमेव कॅसिनो फर्म आहे, जिची नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडियामध्ये वर्णी लागते. यात भारतातील सर्वात लोकप्रिय ऑनलाइन पोकर आणि रमी साइट अड्डा५२ देखील आहे आणि या वर्षाच्या सुरुवातीला या कंपनीने नेपाळमधील काठमांडू येथील मॅरियट हॉटेलमध्ये कॅसिनो उघडला आहे.

हा व्हिडिओ पहाः पंचनामा- पेडणे धारगळ येथील बीग लँण्ड डीलची चौकशी कधी ?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!