राज्यातील इंडस्ट्रीजना 12 तासांच्या शिफ्टसाठी मिळाला ग्रीन सिग्नल

30 सप्टेंबरपर्यंत 12 तासांची शिफ्ट देण्याची परवानगी; कारखाने आणि बॉयलरर्सकडून अधिसूचना जारी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः उद्योगांमधील तूट कमी करण्याच्या प्रयत्नात राज्य सरकारने कारखाने आणि उद्योगांना 30 सप्टेंबरपर्यंत कामगारांना रोजंदारीवर 12 तासांची शिफ्ट देण्याची परवानगी दिली आहे. मंगळवारी याविषयीची अधिसूचना जारी करत कारखाने आणि बॉयलरचे मुख्य निरीक्षक विवेक मराठे म्हणाले की, कोविड-19 महामारीमुळे कारखान्यांना सांगितलेल्या अपवादात्मक गरजेचा सामना करण्यास सक्षम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ओव्हरटाइमसह कोणत्याही आठवड्यात एकूण तासांची संख्या 60 पेक्षा जास्त नसेल आणि कोणत्याही कामगाराला सात दिवसांपेक्षा जास्त वेळ ओव्हरटाइम करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

हेही वाचाः ACCIDENT | कोरकरणवाडा तलावात बुडून एकाचा मृत्यू

तर एक ते दोन महिन्यांत भरपाईची सुट्टी द्यावी

कारखानदार व बॉयलर निरीक्षक म्हणाले, की कारखान्यातील कामगारांच्या इष्टतम वापरासाठी कामकाजाचा कालावधी वाढविण्यासाठी कारखाने कायदा, 1948 (केंद्रीय अधिनियम क्र. 1948 मधील 63) मधील काही तरतुदी शिथिल केल्या आहेत. तात्पुरते निकष असं नमूद करतात की जर कामगार आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी काम करत असेल तर कामगारांना त्वरित एक ते दोन महिन्यांत भरपाईची सुट्टी दिली जावी.

हेही वाचाः प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाच्या अध्यक्षपदी संदेश खोर्जुवेकर

उद्योगांना मनुष्यबळ भेडसावतंय

राज्यात कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने औद्योगिक विभागांना कायमस्वरुपी, तात्पुरते आणि कंत्राटी कर्मचार्‍यांमधील मनुष्यबळाचे प्रश्न भेडसावत आहेत, असं भारतीय उद्योग परिसंघ – गोवाचे अध्यक्ष अतुल जाधव म्हणाले. सीआयआयने राज्य सरकारला ओव्हरटाईमची सध्याची मर्यादा एका तिमाहीत 50 तासांवरून वाढवून देण्यास सांगितलं होतं, जी सरकारने मान्य केली आणि तिमाहीत 75 तासांपर्यंत वाढविली. सन 2020 मध्ये सरकारने उद्योगांना तीन शिफ्टऐवजी 12 तासांच्या दोन शिफ्ट चालविण्यासाठी समान सुविधा दिली होती, असं जाधव म्हणाले.

हेही वाचाः ACCIDENT | धारबांदोड्यात महाराष्ट्र-गोवा टक्कर; एकजण जखमी

कमी कामगारांना कामावर ठेवल्यास वाहतूक, कॅन्टीन, वॉश रूम, चेंजिंग रूम अशा सामान्य जागा आणि सुविधा सॅनिटायझ करणं सोपं असल्याचं उद्योग संस्थांनी सांगितलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!