5 मिनिटांत 25 बातम्या

बातम्यांचा वेगवान आढावा

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

रोहित मोन्सेरात महापालिकेच्या आखाड्यात

आमदार बाबूश मोन्सेरात यांचा मुलगा रोहित मोन्सेरात लढवणार पणजी महानगरपालिका निवडणूक, प्रभाग 3 मधून उमेदवारी, बाबूश मोन्सेरात यांची माहिती

सीसीपीसाठी भाजपची पहिली यादी सोमवारी

पणजी महापालिका निवडणुकीसाठी सोमवारी भाजपची पहिली यादी होणार जाहीर, 13 जुन्या आणि 7 नव्या उमेदवारांना मिळणार संधी, आमदार बाबूश मॉन्सेरात यांची माहिती.

कळंगुटमधील हॉटेलमालकावर बलात्काराचा आरोप

कळंगुटमधील एका हॉटेल मालकावर बलात्काराचा आरोप, दिल्ली पोलिसांची कळंगुटमध्ये कारवाई, गोवा पोलिसांच्या मदतीने दिल्ली पोलिसांकडून कसून तपास.

आणखी दोन दिवस अवकाळीचं सावट

राज्यात आणखी दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज, तर गारपीट आणि अवकाळीनं राज्यातील बागायतदार धास्तावले.

गॅस दरवाढीविरोधात महिला काँग्रेसचं आंदोलन

गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात राज्यातील महिला काँग्रेसची निदर्शनं, प्रतिकात्मक सिलिंडर जाळून महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तळली कांदाभजी, भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

नीती आयोगाची बैठक

शनिवारी पार पडली नीती आयोगाची बैठक, सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्र्यांचीही बैठकीला उपस्थिती, दिवसभर चाललेल्या बैठकीत केंद्राची सर्व मुख्यमंत्र्यांसोबत मॅरेथॉन चर्चा

म्हणे केंद्र सरकारही म्हादईबाबत गंभीर…

नीती आयोगाच्या बैठकीत म्हादईचा मुद्दा, केंद्र सरकार म्हादईबाबत गंभीर असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती, भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली भीती.

आरजीला पुन्हा परवानगी नाकारली

आरजीच्या पेडण्यातील सभेला जिल्हाधिकार्‍यांनी नाकारली परवानगी, पोलिसांच्या हवाल्यानं कोरगावात सभा घेण्यास अटकाव, प्रशासनाच्या आडकाठीमुळे रिव्होल्यूशनरी गोवन्सचे कार्यकर्ते संतप्त.

मिरवणुकीला परवानगी नाकारण्यामागे कोण?

कळंगुटमध्ये शिवजयंतीच्या उत्साहाला गालबोट, पोलिसांनी मिरवणुकीला परवानगी नाकारल्यानं शिवप्रेमी संतप्त, पोलिसांनी नमतं घेतल्यानंतर भव्य मिरवणूक.

कळंगुटमधील प्रकारामागे लोबोंचा हात?

सुभाष वेलिंगकरांचा भाजप सरकारवर हल्लाबोल, कळंगुटमध्ये शिवजयंती मिरवणुकीला परवानगी नाकारल्यावरून टीकेची झोड, मंत्री मायकल लोबोंना धरलं जबाबदार.

सत्तरीच्या भूमिपुत्रांना दमदाटी?

सत्तरीतल्या करंझोळमध्ये अज्ञातांकडून सागवानच्या झाडांची कत्तल, वन खात्याला माहिती देणार्‍या स्थानिकांना अधिकार्‍यांकडून दमदाटी, सत्तरीच्या भूमिपुत्रांकडून दमदाटीचा निषेध.

ईशान किशनची स्फोटक फलंदाजी

ईशान किशनची विजय हजारे ट्रॉफित तुफान फटकेबाजी, अवघ्या 94 चेंडूत कुटल्या तब्बल 173 धावा, 19 चौकार आणि 11 षटकार ठोकत ईशान किशनची तडाखेबाज फटकेबाजी.

सात वर्षांत तुम्ही काय केलं?

आम्ही तेल प्रकल्प उभारले, सात वर्षांत तुम्ही काय केलं? महागलेल्या इंधनावरुन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

शिपाई पदांसाठी आले हजारो अर्ज

बेरोजगारीचं भीषण वास्तव, शिपायाच्या 13 पदांसाठी आले तब्बल 27 हजार 671 अर्ज, एमए, बीटेक, बीएससी आणि हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलेल्या तरुणांचाही शिपाई पदासाठी हरियाणात अर्ज.

रुग्णवाढीनं महाराष्ट्र सरकारची डोकेदुखी वाढली

रुग्णवाढीनं महाराष्ट्र सरकारची वाढवली चिंता, दिवसभरात नव्या 6 हजार 112 रुग्णांची भर; तर मुंबईत शनिवारी दोन महिन्यांतील सर्वाधिक रुग्णवाढीची नोंद, उपनगरांमधील रुग्णवाढीनं डोकेदुखी वाढवली

26 फेब्रुवारीला व्यापार्‍यांची ‘भारत बंद’ची हाक

26 फेब्रुवारीला व्यापार्‍यांची ‘भारत बंद’ची हाक, जाचक ‘जीएसटी’ प्रणालीविरोधात देशव्यापी आंदोलन, ‘कॅट’च्या नेतृत्वाखाली देशव्यापी आंदोलनात दीड हजार ठिकाणी होणार निदर्शनं.

केरळमध्ये सर्वाधिक लव्ह जिहाद…

केरळमध्ये वाढली लव्ह जिहादची प्रकरणं, मेट्रो मॅन ई. श्रीधरन यांचं आणखी एक खळबळजनक वक्तव्य, भाजप प्रवेशाआधी राजकीय वक्तव्यांमुळे श्रीधरन चर्चेत.

भाजप नेत्या शाजिया इल्मी यांना शिविगाळ

दिल्ली भाजपच्या उपाध्यक्ष शाजिया इल्मी यांची पोलिसांत तक्रार, बसपाच्या माजी खासदारानं शिविगाळ केल्याचा आरोप, अकबर अहमद यांनी गैरवर्तन केल्याचा शाजियांचा आरोप.

माघी एकादशीलाही पंढरपुरात संचारबंदी

आषाढी, कार्तिकी पाठोपाठ माघी एकादशीलाही पंढरपुरात संचारबंदीचे आदेश, विठ्ठल दर्शनासह दिंड्यांवरही बंदी, विठ्ठलभक्तांच्या उत्साहावर विरजण.

महाराष्ट्रातही अवकाळीचा फटका

अवकाळी पावसाचा महाराष्ट्रातील शेती-बागायतींना फटका, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भासह मराठवाड्यात रब्बी पिकांवर संक्रांत, महाराष्ट्र सरकार देणार नुकसान भरपाई.

सोनू सूद पुन्हा धावला मदतीसाठी

अभिनेता सोनू सूदची पुन्हा एकदा दरियादिली, उत्तराखंडमधील दुर्घटनेत मृत झालेल्या कामगाराच्या कुटुंबाला मदत, चार मुलींचं स्वीकारलं पालकत्व.

‘शेर शिवराज है…’ नवा ‘शिवपट’

शिवाजी महाराजांज्या जीवनावर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरचा नवा चित्रपट, ‘शेर शिवराज है…’मधून अफजलखान वधाचा इतिहास उलगडणार, यापूर्वी फर्जंद, फत्तेशिकस्तचं केलं दिग्दर्श.

अखेर 4 जूनला येणार ‘83’ चित्रपट

कपिल देवच्या जीवनावर आधारित 83 चित्रपटाची प्रतीक्षा संपली, 4 जूनला येणार प्रेक्षकांच्या भेटीला, रणवीर सिंग प्रमुख भूमिकेत.

कोरोनाचा प्रसार वटवाघुळांमुळे नाही?

चीनमधील वुहान शहरातून कोरोनाचा प्रसार वटवाघळांमुळे न झाल्याचा शास्त्रज्ञांचा निष्कर्ष, वुहानच्या प्राणी बाजारातील उंदीर आणि सश्यांच्या मार्फत कोरोना पसरल्याचा अंदाज.

दक्षिण अमेरिकेत हिमवादळामुळे हाहाकार

दक्षिण अमेरिकेत हिमवादळाचा कहर, लाखो लोकांचं जनजीवन विस्कळीत, बहुतेक भागांत वीज पुरवठा खंडित, तर गरम पाणी आणि अन्नाअभावी लोकांची उपासमार होण्याची भीती.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!