‘देशात कोरोना पॉझिटिव्हिटीचा सर्वाधिक रेट गोव्यात!’

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

पणजीः राज्यात कोविड परिस्थिती हाताबाहेर चाललीये… दिवसागणिक कोविड बाधितांचं प्रमाण ‘वाढता वाढता वाढे…’ असं काहीसं झालंय. लोकांचा हलगर्जीपणा याला नडतोय. त्यामुळे कोविड संसर्गाच्या दुसऱ्या लाटेला सामोरं जाण्यात सरकारच्या नाकी नऊ आलेत. याविषयी आम आदमी पक्षा (आप) चे नेते राहुल म्हांबरेंनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांना पत्र लिहून काळजी व्यक्त केलीये. तसंच राज्यातील वाढत्या कोविड परिस्थितीचा सामना करण्यासाठी 5 टी धोरण राबविण्याचं आवाहनही केलंय.

हेही वाचाः गरजूंचा ‘मसिहा’ सोनू सूदला कोरोनाची लागण, ट्वीट करुन सोनू म्हणाला की…

हा तर देशातील सर्वाधिक रेट

१६ एप्रिलाला राज्यात १००० कोविड प्रकरणांची नोंद झाली असल्याचं आम आदमी पक्षाचे नेते राहुल म्हांबरे यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना लिहिलेल्या पत्रात त्यांच्या निदर्शनास आणून दिलंय. शिवाय गोव्याचा कोविड बाधितांचा २८ टक्के पॉझिटिव्ह रेट हा देशातील सर्वाधिक रेट आहे, याकडेही मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलंय. पुरेसा वेळ असूनही सरकार राज्यात अतिरिक्त कोविड सुविधा निर्माण करण्यात सरकार अपयशी ठरलंय म्हणत म्हांबरेंनी मुख्यमंत्र्यांना धारेवर धरलंय. बेकार वाढत चाललेल्या कोविड परिस्थितीशी लढण्यासाठी रुग्णालयांमध्ये खाटा किंवा आयसीयू सुविधा उपलब्ध नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केलीये. तसंच या संबंधी तातडीने अतिरिक्त सुविधा निर्माण करण्याची मागणी त्यांनी केलीये.

हेही वाचाः Breaking | भारतात कोरोनाची त्सुनामी! तब्बल २ लाख ३४ हजार ६९२ नवे रुग्ण

कोविडशी लढायचं तर हवं 5टी धोरण

कोविड-19शी दोन हात करण्यासाठी 5 टी धोरणाचा अवलंब करण्याविषयी म्हांबरेंनी मुख्यमंत्र्यांना सुचवलंय. टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रॅकिंग, ट्रिटमेंट आणि टीम वर्क या ५ टी चं ‘आप’ नेहमीच समर्थन करत आलंय. पण चाचणी सुविधा वाढविण्यात आणि पॉझिटिव्ह केसेस शोधण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरलंय, याचं दुःख आहे.

हेही वाचाः कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा गोव्याचा वेग चिंताजनक! पण गोंयकरांना त्याचं काही पडलंय का?

निव्वळ अपमानास्पद

यापूर्वी ‘भिवपाची गराज ना’ चा पवित्रा घेतलेल्या गोवा सरकारने स्वीकारलेल्या नवीन “टिका उत्सवाची” म्हांबरेंनी खिल्ली उडवली. ते म्हणाले, निवडणूक प्रचारासाठी करदात्यांनी पुरवलेल्या पैशांद्वारे केलेल्या लसीकरण मोहिमेचा वापर करणे हे निव्वळ अपमानास्पद आहे. कृपया राजकारण बाजूला ठेवा आणि लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी स्वयंसेवी संस्था, ग्राम समित्या आणि अगदी धार्मिक संस्थांसह सर्वांना सामील करा. गोंयकारांचं जीवन मूल्यवान आहे आणि ते गृहित धरले जाऊ शकत नाही.

हेही वाचाः NEET PG 2021 Postponed | वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर NEET PG परीक्षा अखेर रद्द

5 टी धोरणाला द्या प्राधान्य

म्हांबरेंनी मुख्यमंत्र्यांना प्राधान्य तत्त्वावर पाच उपाययोजना राबविण्याचं आवाहन केलं, ज्यामध्ये टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रॅकिंग, ट्रिटमेंट आणि टीम वर्क या ५ टी यांचा समावेश आहे. व्यावसायिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या उत्सुकतेबद्दल म्हांबरेंनी खेद व्यक्त केला आणि मनोरंजन तसंच गेमिंग उपक्रमांवर कोणतेही निर्बंध नाहीत याकडे मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधले. तसंच गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांवर आळा घालण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही केली.

हेही वाचाः CORONA | कोरोनावरील घरगुती औषधाचा दावा किती सत्य?

राज्यासाठी लसींचा अतिरिक्त साठा

लसीकरणाची वयोमर्यादा १८ वर्षांपर्यंत कमी करावी, अशी मागणी करतानाच गोव्यासाठी लसींचा अतिरिक्त साठा उपलब्ध करण्याची मागणी करण्यास मुख्यमंत्र्यांना सुचवलं. लसीकरण मोहीम प्रत्येक गोंयकाराच्या दरवाजावर पोहोचल्यास खूप मोठा फायदा होणार असल्याची वेडी आशा त्यांनी व्यक्ती केली.

हेही वाचाः CORONA VACCINE | ‘रेमडेसिविर’मुळे खरंच कोरोना रुग्णांचा जीव वाचतो?

निगेटिव्ह कोविड प्रमाणपत्र आवश्यक!

पर्यटन उद्योगाला विश्वासात घेऊन मुख्यमंत्र्यांनी गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या प्रवेशावर योग्य निर्बंध घालून, किमान ज्या राज्यांमध्ये जास्त प्रकरणं आहेत, अशा राज्यांमधून गोव्यात प्रवेश करणाऱ्यांना पर्यटकांना निगेटिव्ह कोविड प्रमाणपत्राचे सादर करण्याचं धोरण तयार करावं, अशी सूचनाही केली.

हेही वाचाः CORONA UPDATE | धक्कादायक । निवडणुकीच्या राज्यांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला दुप्पट

गोव्याने पुढाकार घेऊन ‘टिका उत्सव’साठी सर्व संभाव्य मार्गांचा उपयोग करत 100 टक्के लसीकरण करून इतरांसाठी एक आदर्श निर्माण करावा, असंही त्यांनी सुचवलं

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!