सुवर्ण गोव्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया

राज्यपालांकडून 35 व्या गोवा घटक राज्य दिनाच्या गोंयकारांना शुभेच्छा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः गोव्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गोव्यातील लोकांना गोवा घटक राज्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यपाल आपल्या संदेशात म्हणालेत, 34 वर्षांपूर्वी 30 मे रोजी गोव्याचं केंद्र शासित प्रदेशातून भारतीय संघराज्यात रूपांतर झालं. 1967 मध्ये जनमत कौलापासून सुरू झालेल्या दीर्घकाळाच्या आणि कठीण प्रयत्नातून गोव्याला स्वतंत्र आणि वेगळं अस्तित्त्व मिळालं. या आनंददायी प्रसंगी,  आपण गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळविण्यासाठी योगदान दिलेल्या सर्व नेते, विचारवंत आणि गोव्यातील लोकांचं कृतज्ञतेने स्मरण करूया. राज्याच्या राजकीय इतिहासात घटक राज्याचा दर्जा महत्त्वाचा आहे.

हेही वाचाः मुख्यमंत्र्यांचे उत्तम वित्तव्यवस्थापन

राज्याच्या विकासासाठी सरकारकडून जोमाने काम

गोवा राज्य लोकांच्या सामाजिक-आर्थिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रभावीपणे काम करीत आहे. गोव्याला देशातील सर्वात विकसित राज्यांमध्ये गणलं जातं याचा आपण सर्वांना अभिमान आहे. देशात गोव्याचे दरडोई उत्पन्न अधीक आहे ही अभिमानाची बाब आहे. गेल्या अनेक वर्षांत अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या असून रस्ते, रेल्वे, विमानतळ व पुलांच्या स्वरुपात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन राज्याच्या विकासासाठी शासनाने जोमाने काम केलं आहे.

हेही वाचाः गोवा विद्यापीठाचे ऑनलाइन वर्ग 7 जूनपर्यंत रद्द

विविध विकास कामं

19 डिसेंबर 2020 रोजी गोवा मुक्तीच्या 60 व्या वर्ष दिन सोहळ्याचं उद्घाटन करताना भारताच्या राष्ट्रपतींनी गोव्यात लागू अलेल्या समान नागरी कायद्याचं कौतुक करून ते अभिमानास्पद असल्याचं म्हटलं आहे. यावर्षी मार्चमध्ये, सरकारने पर्वरीत प्रतिष्ठित नवीन उच्च न्यायालय संकुलाचं काम पूर्ण करून त्याचं उद्घाटन केलं आहे. पंतप्रधानांनी दिलेल्या आत्मनिर्भर भारत आवाहनाच्या अनुषंगाने सरकारने 2020 मध्ये “स्वयंपूर्ण गोंय” मोहीम सुरू केली आहे. या मिशन अंतर्गत, सरकार आणि जनतेमधील दरी कमी करणं आणि सरकारी योजना लोकांच्या दारापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सरकारी कर्मचाऱ्यांना स्वयंपूर्ण मित्र म्हणून नियुक्त केलं गेलं आहे.

आदरातिथ्य आणि सामाजिक मैत्रीसाठी गोवा परिचित

गेल्या काही वर्षांत झालेल्या गोव्यातील प्रगती आणि समृद्धीचं श्रेय राज्यात शांतता आणि सौहार्दाच्या वातावरणाला जात आहे. गोव्यातील लोक त्यांच्या आदरातिथ्य आणि सामाजिक मैत्रीसाठी परिचित आहेत. गोवा जगभरातील असंख्य पर्यटकांना आकर्षित करणारं नैसर्गिक सौंदर्य, समृद्ध वनस्पती आणि जीवसृष्टी आणि चैतन्यमय संस्कृती यासाठी प्रसिद्ध आहे. पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारने नवीन पर्यटन धोरण- 2020 चं सुरू केलं आहे. त्याशिवाय समुद्रकिनार्‍यावरील पर्यटनाचं प्रमुख वैशिष्ट्य असलेली एक नवीन टुरिझम शॅक पॉलिसी तयार केली गेली आहे.

हेही वाचाः जीएसटी काऊन्सिलची 43वी बैठक संपन्न

कोविड काळात योग्य व्यवस्थापनासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न

मार्च 2020 पासून देशात कोविड -19 संसर्ग सर्व देशभर पसरला आहे. यामुळे देशाची सामाजिक-आर्थिक प्रगती विस्कळीत झाली आहे. लोकांना या साथीच्या रोगापासून वाचवण्यासाठी सरकारने विविध उपाययोजना राबवल्या आहेत. पर्यटन खुलं केलं आहे. तथापि, मार्च 2021 मध्ये विषाणूच्या दुसर्‍या लाटेचा उद्रेक झाल्यानं वाढतं संक्रमण आणि मृत्यूंच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारला नवीन आणि गंभीर आव्हानांना सामोरं जावं लागलं आहे. महामारीमुळे अनेकांचा बळी गेला आहे. तथापि, समाधानाची गोष्ट म्हणजे आमच्या कोरोना वॉरियर्स, विशेषत: डॉक्टर, परिचारिका, फ्रंटलायन वर्कर्स आणि इतरांच्या अथक आणि समर्पित सेवेमुळे बऱ्याच लोकांचे प्राण वाचले आहेत. सरकारने आरोग्याच्या पायाभूत सुविधांचा विस्तार, पुरेशी उपकरणं, अतिरिक्त कर्मचारी वर्ग आवश्यक औषधं उपलब्ध करून तसंच टीका उत्सवद्वारे लोकांचं लसीकरण करून या संकटाच्या काळात योग्य व्यवस्थापनासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

हेही वाचाः खासगी बस व्यावसायिकांची आर्थिक स्थिती बिकट

कोरोनाला हरवण्यासाठी प्रत्येकाचं योगदान आवश्यक

कोरोनाला पराभूत करायचं असल्यास आमचा प्रत्येकाचा सहभाग आणि योगदान आवश्यक आहे. मास्क घालून, सामाजिक अंतरांचं पालन करून आणि स्वच्छता राखून लोकांनी सुरक्षा उपायांचं पालन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. महामारी कमी झाली की अर्थव्यवस्था, विशेषत: पर्यटन आणि खाण क्षेत्रातील व्यवसाय सुरू करण्यास सरकार उत्सुक आहे. आपण सर्व आव्हानांवर मात करुन प्रगती व विकासाच्या दिशेने आपली वाटचाल पुढे चालू ठेवो.

हेही वाचाः दिलासादायक! बऱ्याच दिवसांनंतर रुग्णवाढ १ हजाराच्या आत

गोव्याच्या घटक राज्य दिनानिमित्त मी माझ्या सर्व बंधू- भगिनींना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. सुवर्ण गोव्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी मनापासून काम करण्यास वचनबद्ध होऊया, असं राज्यपाल म्हणतात.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!