भाजपकडून राज्यात नोकर भरती घोटाळा

गोवा फॉरवर्डच्या दुर्गादास कामतांचा आरोप

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः राज्यात सरकारकडून नोकर भरती घोटाळा सुरू असल्याचा खळबळजनक आरोप गोवा फॉरवर्डच्या दुर्गादास कामत यांनी केला आहे. याविषयीचे पुरावे सादर करत त्यांनी हा आरोप केला आहे.

हेही वाचाः नाटक शब्दावरुन ड्रामा, विधानसभेचं कामकाज तहकूब

राज्यात नोकर भरती घोटाळा

दुर्गादास कामत यांनी ट्विट करत हा प्रकार उघडकीस आणलाय. शिवाय पत्रकार परिषदेत त्यांनी याविषयी सविस्तर माहिती दिलीये. कामत म्हणालेत, सरकार ज्या नोकरी जाहीर करतंय त्या सगळ्या मॅच फिक्सिंगसाठी चालू आहेत हे गोवा फॉरवर्ड वारंवार सांगत आलंय. मागच्या दिवसात गोवा फॉरवर्डचे कर्मचारी संयोजक (employee convener) यांनी विभाग अधिकारी पदांसाठी (section officer post) पोस्ट कशाप्रकारे फिक्सिंग करणं सुरू आहे हे माध्यमांसमोर ठेवलं होतं. त्यानंतर विधीमंडळ सचिवांना पत्र लिहून असे प्रकार पुढे सुरू राहिल्यास आम्हाला हायकोर्टात जावं लागेल, असा इशारा दिला होता. त्यानंतर 29 एप्रिल विभाग अधिकारी पदांसाठी आलेली जाहिरात लगेच 30 एप्रिलला रद्द झाली, असं कामत म्हणाले.

असिस्टेंट एम्प्लायमेंट ऑफिसर (Assitant Employment Officer)च्या पदांच्या भरतीतही मोठा घोटाळा आहे. या पदांसाठीची परीक्षा होती 27 जुलैला. त्याप्रमाणे अर्ज केलेल्या उमेदवारांना कॉल लेटर्स किमात 15 दिवस अगोदर मिळायला हवे होते. मात्र कॉल लेटरवर तारीख आहे 16 जुलैच. दुसरी गोष्ट म्हणजे काल 27 जुलैला या पदांसाठीची परीक्षा झाली आणि त्यानंतर या पदांसाठी अर्ज केलेल्या काही उमेदवारांना आज कॉल लेटर्स मिळालेत. आता इथे मुख्यमंत्री किंवा कामगार आणि रोजगार आयुक्त यांना खोटं बोलायला संधीच नाही. कारण कॉल लेटरवर स्टॅम्पसुद्धा कालचा आहे. यातून स्पष्ट होतंय की भाजप सरकार आपल्या लोकांना सरकारी नोकरीत घुसवण्यासाठी राज्यात नोकर भरतीचा घोटाळा करू लागलंय. जर कमी शिकलेले, पक्षाचे कार्यकर्ते अशा व्यक्ती सरकारी कार्यालयांमध्ये घुसू लागल्या, तर सरकार उत्तम प्रकारे कार्य कसं करणार? असा सवाल कामतांनी केलाय. सरकार निव्वळ तरुणांच्या भावनांशी खेळतंय.

असिस्टेंट एम्प्लायमेंट ऑफिसरच्या पोस्टसाठीची परीक्षा पुन्हा घ्या

असिस्टेंट एम्प्लायमेंट ऑफिसरच्या पोस्टसाठी 27 जुलै रोजी घेतलेली परीक्षा तात्काळ मोडीत काढून पुन्हा नव्याने ही प्रक्रिया करण्यात यावी. तसंच या पदांसाठी अर्ज केलेल्या अर्जदारांना पुन्हा नव्याने कॉल लेटर्स पाठवून परत परीक्षा घ्यावी आणि पात्र उमदेवारांनाच या पदावर भरती करून घ्यावं, अशी कामगार आणि रोजगार आयुक्तांकडे आमची मागणी आहे. असं न केल्यास आम्हाला कोर्टात जाण्यावाचून पर्याय नाही, असा इशारा कामतांनी दिलाय.

हा व्हिडिओ पहाः Recruitment Scam In Goa? राज्यात नोकर भरती घोटाळा?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!