निवृत्त खलाशांसाठी गोवा सरकारची नवी पेन्शन योजना

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांकडून घोषणा; ट्विट करत दिली माहिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी गोव्यातील निवृत्त खलाशांसाठी २,५०० रुपये मासिक मदत घेऊन ‘नवीन पेन्शन योजना’ जाहीर केली. गेल्या काही काळापासून सेवानिवृत्त खलाशांकडून त्यांच्यासाठी राज्य पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरत होती. त्यामुळे 25 जून आंतरराष्ट्रीय खलाशी दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्र्यांनी या नव्या पेन्शन योजनेची घोषणा केली.

हेही वाचाः भाजप-काँग्रेसची राजकीय टोलेबाजी

ट्विट करत केली घोषणा

आंतरराष्ट्रीय खलाशी दिनाच्या दिवशी डॉ. प्रमोद सावंतांनी ट्विट करत नवी पेन्शन योजना जाहीर करताना म्हटलं, आंतरराष्ट्रीय खलाशी दिनाच्या दिवशी गोव्यातील निवृत्त खलाशांसाठी नव्या पेन्शन योजनेची घोषणा करताना मला खूप आनंद होतोय. या योजनेंतर्गत निवृत्त खलाशांना मासिक 2 हजार 500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.

मनोहर पर्रीकरांनी केली होती योजनेची घोषणा

२०१२ पासून निवृत्त खलाशांसाठी पेन्शन योजना सुरू होती. ऑक्टोबर २०१९ मध्ये ही योजना बंद झाली. 2019 पर्यंत राज्यातील ३,००० हून अधिक खलाशी आणि विधवा या योजनेंतर्गत लाभ मिळवत होते. 2012 मध्ये मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना या योजनेची घोषणा करण्यात आली होती.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!