गोवा सरकार शाळा सुरु करण्याच्या तयारीत? शिक्षकांसाठी घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

लसीकरणाबाबत घेतलेल्या निर्णयामुळे चर्चांना उधाण

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर 6 ते 8 आठवड्यांवरुन 12 ते 16 आठवडे करण्यात आलं होतं. मे महिन्यात हा निर्णय घेण्यात आला होता. भारत सरकारनं घेतलेल्या या निर्णयावरुन बरीच चर्चाही रंगली होती. दरम्यान, कोरोना एन्टीबॉडी वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. अशातच आता गोवा सरकारनं शिक्षकांचं लसीकरण पूर्ण व्हावं म्हणून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. या निर्णयात कोरोनाच्या दोन डोसमधील अंतर फक्त शिक्षकांसाठी कमी करण्यात आल्याचं समोर आलंय.

अंतर कमी!

गोवा सरकारनं कोरोना लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी केलंय. शिक्षकांसाठी आता 6 आठवड्यांच्या अंतरानं कोरोना लस देण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी हा विशेष निर्णय लागू करण्यात आला. कोरोना लसीकरण शिक्षक आणि शिक्षकेत कर्मचाऱ्यांमध्ये वेगानं व्हावं, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जातंय.

school-reopen

शाळा सुरु होणार?

इतकंच काय तर 5 सप्टेंबरपूर्वी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचं लसीकरण पूर्ण करण्याचं ध्येय देखील निश्चित करण्यात आलंय. कोविड लसीकरणाचे नोडल ऑफिसर डॉ. अनुर नेत्रावळकर यांनी ही माहिती दिली आहे. सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळे शिक्षकांच्या लसीकरणाचा वेग वाढण्याची शक्यता तर आहेत, पण त्यासोबत आणखी एका शक्यता वर्तवली जातेय.

पुन्हा वर्ग भरणार?

एकीकडे नवी दिल्ली मध्ये आजपासून शाळा सुरु झाल्यात. तर दुसरीकडे राज्यात काही प्रमाणात महाविद्यालयीन वर्गदेखील सुरु करण्यात आले आहेत. ऑफलाईन शाळा सुरु करण्याच्या दृष्टीनं सरकार प्रयत्नशील असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही.
आधीच गेलं जवळपास दीड वर्ष ऑनलाईन शाळांमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम झाल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं होतं. त्यानंतर आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचीही भीती वर्तवली जातेच आहे. अशा पार्श्वभूमीवर लसीकरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळेच सरकारकडून हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जातंय. आता राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या निर्णयाचा लाभ घेत शक्य तितक्या लवकर पूर्ण लसीकरण करुन घेतात का, हे पाहणं महत्त्वाचंय.

हेही वाचा – Fact Check | तुमचं एसबीआयमध्ये अकाऊंट असेल तर कदाचित तुम्हालाही हा मेजेस आलेला असू शकतो!

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!