होम आयसोलेशन कीट ठरणार क्रांतिकारी!

आरोग्य यंत्रणेचा ताण कमी होणार : मुख्यमंत्री प्रमोद सावंत. राज्यात होम आयसोलेशन पर्याय निवडण्याचे प्रमाण वाढले. होम आयसोलेशन कीट वाटप योजनेचा शुभारंभ.

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजी : गोव्यात सद्यस्थितीत साधारण साडेतीन हजार लोकांनी होम आयसोलेशनचा पर्याय निवडला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी दिली. या सर्वांना लवकरच होम आयसोलेशन कीट मिळणार असल्याचेही मुख्यमंत्र्यानी सांगितले. कोविड 19 महामारीच्या नियंत्रणात आयुष मंत्रालयाच्या उपाययोजनांचा मोठा वाटा आहे. राज्यातील आयुष डॉक्टरांच्या माध्यमातून कोविड नंतरच्या व्यवस्थापनावर भर देणार असल्याचे मुख्यमंत्र्यानी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होम आयसोलेशन कीट मोहिमेचा शुभारंभ झाला. यावेळी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे (Vishwajeet Rane), खात्याचे सचिव अमित सतेजा, आरोग्य खात्याचे संचालक डॉ. ज्यो डिसा, जीएमसीचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर (Shivanand Bandekar), एफडीएच्या संचालक ज्योती सरदेसाई यांची उपस्थिती होती.

आरोग्य यंत्रणेचा ताण कमी होणार
होम आयसोलेशन किटमुळे आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात कोविडच्या रुग्णांची रिकव्हरी रेट 85.98 टक्के इतकी आहे. देशापेक्षा आणि इतर राज्यांपेक्षा ही रिकव्हरी रेट जास्त असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अजून कोविड 19 संसर्ग संपलेला नाही, पुढील काळातली तो कायम असेल. त्यामुळे होम आयसोलेशन निवडलेल्या लोकांना किटचा मोठा फायदा होणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

हॉस्पिटलमध्ये खाटांची कमतरता नाही!
राज्यातील हॉस्पिटलमध्ये खाटांची कमतरता नाही, विरोधक महिती न घेता आरोप करत आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. कोविड केयर सेंटर्स साधारण 50 टक्के रिकामी आहेत. सद्याच्या घडीला फक्त 600 पेशंट कोविड केयर सेंटरमध्ये आहेत. लोक आता होम आयसोलेशनला जास्त प्राधान्य देत असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. होम आयसोलेशन कीट मिळाल्यानंतर हॉस्पिटलमधील रुग्णांची भरती कमी होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

आरोग्य खात्यात आणखी नोकर भरती
दक्षिण गोव्याचे जिल्हा हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे म्हणाले. तिथे अणखी 200 खाटा वाढविण्याचे काम सुरू असल्याची माहिती राणेंनी दिली. आमच्या समोर आव्हाने खूप आहेत. सरकार या सर्व आव्हानांवर मात करण्यास सज्ज असल्याच्या विश्वास राणेंनी व्यक्त केला. आरोग्य खात्यात नोकर भरती सुरू आहे, भविष्यातही ती सुरू राहणार असल्याचे मंत्री विश्वजीत राणेंनी सांगितले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!