माजी राज्यपाल डॉक्टर मृदुला सिन्हा यांच्या निधनानं गोवा हळहळला

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो : डॉक्टर मृदुला सिन्हा (Mridula Sinha) यांचं निधन झालंय. त्यांच्या निधनानं संपूर्ण गोवा हळहळलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी सिन्हा यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. सिन्हा यांच्या जाण्यानं देशाचं मोठं नुकसान झालं असल्याचं त्यांनी म्हटलंय.
कला आणि साहित्यात डॉक्टर मृदुला सिन्हा यांचं योगदान मोठं होतं. त्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक होत्या. त्यांच्या जाण्याचं होणारं नुकसान कधीच भरुन निघणार नाही, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत. सर्वाधिक काळ त्या गोव्याच्या राज्यपाल होत्या. 2014 ते 2019 या इतका प्रदीर्घ काळ सिन्हा गोव्याच्या राज्यपाल होत्या. त्यांनी 77व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मृदुला सिन्हा या मूळच्या बिहार राज्यातील मुजफ्फरपूरमधील. नवी दिल्लीत त्यांची प्राणज्योत मावळली.
पाचवा स्तंभ नावानं त्यांनी एक नियतकालीक काढलं होतं. वाजपेयी सरकारमध्ये त्या केंद्रीय समाज कल्याण बोर्डाच्या अध्यक्ष होत्या. त्यांच्या एका पुस्तकावर आधारीत सिनेमाही बनवण्यात आला होता. सिन्हा यांचं लेखन हे मुख्यतः परंपरा यांवर आधारीत होती. बिहारमधील छठपुजेविषयी त्यांचा प्रचंड अभ्यास होता. त्यावर त्यांनी सातत्यानं लिखाणही केलं होतं.
मुख्यमंत्र्यांचं ट्वीट
पंतप्रधानांचं ट्वीट
केंद्रीय गृहमंत्र्यांचं ट्वीट