म्हादईप्रश्नी कर्नाटकविरुद्ध सुप्रीम कोर्टात अवमान याचिका

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याबाबत कालच केलं होतं सुतोवाच. म्हादईच्या पाणी वाटपासंबंधी कुठलीही तडजोड केली जाणार नसल्याचा इशारा.

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

पणजी : म्हादई नदीचं पाणी अवैधरीत्या वळविल्याप्रकरणी कर्नाटकविरुद्ध गोवा सरकारनं मंगळवारी सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल केली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी या संदर्भात ट्विट करून ही माहिती दिली.

म्हादईच्या पाणी वाटपासंबंधी कुठलीही तडजोड केली जाणार नाही. आम्ही अखेरपर्यंत या प्रश्नावर भांडत राहू, असंही मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, म्हादईच्या प्रश्नाबाबत विरोधी पक्षांनी आमच्याकडे बोटं दाखवण्याची गरज नाही, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. मी मुख्यमंत्री झाल्यानंतरच लवादाच्या पाणि वाटप आदेशाला हरकत घेतली गेली, असंही ते म्हणाले होते. आताही मी आणि माझे सरकार म्हादईच्या प्रश्नावर लक्ष ठेवू असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला होता. दोन दिवसाच्या आत सर्वोच्च न्यायालयात कर्नाटक विरुध्द अवमान याचिका सादर केली जाईल असंही ते म्हणाले होते.

म्हादईचे पाणी कर्नाटकला देण्यात काँग्रेसचाच ‘हात’
म्हादईचे पाणी मलप्रभेत वळवण्यात काँग्रेस सरकाराचा मोठा सहभाग आहे, असा गंभीर आरोप मुख्यमंत्र्यांनी केला होता. काँग्रेसच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्र्यानी कर्नाटकला पाणी वळवण्यास मुभा दिली आणि महाराष्ट्राला विर्डी धरण बांधण्यास हिरवा झेंडा दाखवल्याचाही आरोप केला. नंतरच्या 2007 ते 2012च्या काळात काँग्रेस मुख्यमंत्र्यानी बेकायदेशीर मायनींगमध्ये जास्त रस घेतला, आणि म्हादईला विसरले, असं म्हणत प्रमोद सावंत यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. तोपर्यंत कर्नाटक सरकार कणकुंबी ते मलप्रभेपर्यंत 10 मीटर जमिनीखालून कॅनल करुन मोकळे झाले आणि म्हादईच्या आजच्या प्रश्नाला सर्वस्वी काँग्रेसच जबाबदार आहे, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्र्यांनी केली होती.

हेही वाचा…
काँग्रेसचाच ‘हात’ ठरला म्हादईचा ‘घात’, गोव्याची दोन दिवसांत अवमान याचिका
जावडेकरांनी हात झटकले; म्हादईप्रश्नी बोलण्यास नकार
म्हादईप्रश्नी या नेत्याचा मुख्यमंत्र्यांना इशारा, 2 दिवसांची मुदत

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!