गोवा शिक्षण विभागाने मागवले कोविडमुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांचे तपशील

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजीः गोवा शिक्षण विभागाने आपल्या सर्व संलग्न संस्थांना कोविड-19 महामारीत अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांचे, तसंच आईवडिलांपैकी एकाला गमावलेल्या विद्यार्थ्यांचे तपशील देण्यास सांगितलं आहे. राज्याचे शिक्षण संचालक डी. आर. भगत यांनी शनिवारी जारी केलेल्या परिपत्रकात शैक्षणिक संस्थांना माहिती संकलित करण्यास आणि 7 जूनपर्यंत विभागाकडे सादर करण्यास सांगितलं आहे.
हेही वाचाः CRIME | सांतिनेझ गोळीबार प्रकरणातील टोळीला अटक
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने मागवले तपशील
अलीकडे कोविड-19 च्या घटनांमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे अनेक मुलांनी आपले पालक गमावलेत, तर काही मुलांनी आईवडिलांपैकी एकाला गमावलंय. अनेक मुलं अनाथ झाली आहेत. अशा परिस्थितीत सामाजिक आणि मानसिक आरोग्य सेवेच्या गरजा असलेल्या संस्थेतील मुलांना आधार देणं सेवा प्रदात्यांना आव्हानात्मक वाटू शकतं. त्यामुळे नवी दिल्लीतील राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने विभागाला ‘बाल स्वराज्य पोर्टल’वर अपलोड केलेली माहिती सादर करण्यास सांगितलं आहे, असं गोवा शिक्षण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलंय.

7 जून पूर्वी सादर करण्याची विनंती
या संदर्भात सर्व संस्थांना 7 जून 2021 रोजी किंवा त्यापूर्वी गुगल स्वरूपात माहिती सादर करण्याची विनंती केली जाते, असं भगत यांनी म्हटलं आहे.