डब्ल्यूआयआरसी- आयसीएसआयतर्फे रक्तदान शिबिर

8 जून रोजी पणजीतील इंडियन रेड क्रॉस सोसायटीमध्ये शिबिर

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः यंदा आयसीएसआय पीसीएस दिवस 2021 साजरा करण्याच्या निमित्ताने आयसीएसआयचा गोवा चॅप्टर डब्ल्यूआयआरसीने इंडियन रेड क्रॉस सोसायटी, गोवा आणि डेम्पो कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्सचे एनएसएस युनिट संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे.

हेही वाचाः CORONA UPDATE | पॉझिटिव्ह बातमी! सलग चौथ्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट

कधी आणि कुठे होणार शिबिर

हे रक्तदान शिबिर सोमवारी 08 जून 2021 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत पणजीतील 18 जून रस्त्यावर समाजकल्याण विभागाच्या समोर असलेल्या नगरपालिकेच्या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील इंडियन रेड क्रॉस सोसायटीमध्ये आयोजित करण्यात आलंय.

हेही वाचाः मुरगाव पोलिस स्थानक परिसरात वृक्षारोपण

पुढे या आणि रक्तदान करा

प्रत्येक रक्तदाता जीवनरक्षक आहे. रक्तदानासह एखाद्याला नवीन आयुष्य देणं हे प्रत्येक रक्तदात्याच्या हातात आहे. त्यामुळे प्रत्येकाने पुढे येऊन रक्तदान केलं पाहिजे. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना विनंती आहे की या रक्तदान मोहिमेत भाग घेण्यासाठी कृपया पुढे या आणि https://forms.gle/BAraAUCToCZXD7cn6 या लिंकवर स्वत:ची नाव नोंदणी करा, असं आवाहन डब्ल्यूआयआरसी-आयसीएसआयचे अध्यक्ष सीएस अभिजित राणेंनी केलंय.

रक्तदानादरम्यान कोविड नियमावलीचं पालन

पात्र रक्तदात्यांसाठी रक्तदान आणि संबंधित सर्व चाचण्या विनामूल्य केल्या जातील. रक्तदान शिबिरादरम्यान कोविडशी संबंधित सर्व नियमावलीचं काटेकोरपणे पालन केलं जाईल. कृपया रक्तदान करायला येताना सोबत आपलं वैध ओळखपत्र पुरावा म्हणून आणावा. तसंच रक्तदान शिबिरासंबंधी काही शंका असल्यास कृपया खाली दिलेल्या लिंकला भेट द्यावी, असं राणे म्हणालेत.
https://docs.google.com/document/d/1-DFyoUyPAxpk5CU0fPO-NHct9tJB90ZGg2s_4XjRpIw/edit?usp=sharing

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!