आयसीएसआयच्या गोवा चॅप्टरकडून रक्तदान शिबिराचं आयोजन

शिबिराला लोकांचा उत्तम प्रतिसाद; सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन आयसीएसआयकडून शिबिराचं आयोजन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः यंदा आयसीएसआय पीसीएस दिवस 2021 साजरा करण्याच्या निमित्ताने आयसीएसआयचा गोवा चॅप्टर डब्ल्यूआयआरसीने इंडियन रेड क्रॉस सोसायटी, गोवा आणि डेम्पो कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्सचे एनएसएस युनिट संयुक्त विद्यमाने त्यांचे सदस्य, विद्यार्थी, नातेवाईक तसंच मित्रपरिवारासाठी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं.

हेही वाचाः सत्तरीतल्या पोर्तुगीजकालीन ‘कादय’ दुर्लक्षीत, संवर्धनाबाबत सरकारी अनास्था

शिबिराला उत्तम प्रतिसाद

या शिबिराला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. कोविड महामारीच्या या संकटकाळात हा अत्यावश्यक प्रयत्न सामान्य आणि आपत्कालीन सुरक्षित आणि पुरेसा रक्तपुरवठा सुनिश्चित करतो. तसंच यातून सुसंघटित, ऐच्छिक आणि विनामोबदला रक्तदात्यांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित होते. आयसीएसआयच्या गोवा चॅप्टरने आपली सामाजिक जबाबदारी लक्षा घेऊन समाजाला पाठिंबा देताना हे एक छोटंसं योगदान दिलं आहे, असं आयसीएसआयसीसीच्या गोवा चॅप्टरचे अध्यक्ष अभिजित राणे म्हणाले.

हेही वाचाः १९९०मधील गुळेली ग्रामीण आरोग्य केंद्र सुस्थितीत; वाळपईतील नव्या हॉस्पिटलची इमारत धोकादायक

कोविड नियमावलीचं पालन करून शिबिराचं आयोजन

कोविड नियमावलीचं पालन करून या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या रक्तदान मोहिमेच्या आयोजनात सहकार्य केल्याबद्दल दाते, रेड क्रॉस सोसायटी आणि एसएस धेंपो कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स यांचे गोवा चॅप्टरच्या अध्यक्षांनी आभार मानले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!