अखेर निर्णय झालाच तर! नोव्हेंबरपासून कसिनो उघडणार

पहिल्या लॉकडाऊनपासून गेले अनेक महिने कसिनो बंद

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

ब्युरो : गेल्या अनेक महिन्यांपासून ज्याची प्रतीक्षा होती, तो निर्णय अखेर कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला आहे. राज्यातील कसिनो नोव्हेंबरपासून सुरु होणार आहेत. त्यामुळे राज्यातील पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जातो आहे. कसिनो कधी उघडणार, असा प्रश्न सातत्यानं उपस्थित केला जात होता. मात्र कोरोनामुळे कसिनोमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं कितपत शक्य आहे, यावर शंका घेतली जात होती. मात्र अखेर कसिनो सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील कोरोनाचा रिकवरी रेटही 93 टक्क्यांच्या पुढे गेली आहे. ही एक दिलासादायक बाब आहे. रिकवरी रेट वाढल्यानं राज्यातील कोरोनाची भीतीही कमी होत असल्याचं चित्र आहे. परिणामी पर्यटकही वाढतील, असा विश्वास व्यक्त केला जातो आहे. त्यामुळे कसिनो सुरु करुन अर्थचक्रास आणखी गती येईल, असं बोललं जातंय.

कसिनोची दिवाळी जोरात

दिवाळीमध्ये अनेक पर्यटक हे गोव्यात येत असतात त्या पार्श्वभूमीवर अखेर सरकारनं कसिने सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यमंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत कसिनो बाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. १ नोव्हेंबरपासून राज्यातील कसिनो सुरु होत आहेत. त्यामुळे कसिनो चालकांसह कर्मचाऱ्यांनाही मोठा दिलासा मिळालाय.

अर्थचक्राला गती येणार

कोरोना पसरु नये म्हणून अटी शर्थींसह कसिनो सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यात अंदाजे चार पेक्षा जास्त कसिनो आहेत. हे कसिनो लॉकडाऊनपासून बंद होते. त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय. कसिनो सुरु केल्यामुळे राज्याच्या अर्थचक्रालाही गती येईल, असा विश्वास व्यक्त केला जातो आहे.

पाहा मुख्यमंत्री काय म्हणाले?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!