Goa Casino | राज्यातील सर्व कॅसिनो राहणार २४ तास बंद…

मध्यरात्री १२ पासून रविवार मध्यरात्रीपर्यंत कॅसिनोंचे सर्व व्यवहार बंद

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राष्ट्रपिता म. गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व कॅसिनो २४ तास बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिलेले आहेत. २ ऑक्टोबरच्या (शनिवारी) मध्यरात्री १२ पासून रविवार मध्यरात्रीपर्यंत कॅसिनोंचे सर्व व्यवहार बंद राहतील, असे गृह खात्याने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.
हेही वाचाःम्हादई प्रकल्पाला केंद्र सरकारचा ‘हिरवा कंदील’…

२४ तासांसाठी कॅसिनोंचे सर्व व्यवहार बंदचे आदेश

म. गांधी जयंतीनिमित्त दरवर्षी देशभरात २ ऑक्टोबर हा दिवस ‘ड्राय डे’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सर्वच ठिकाणची मद्यालये बंद ठेवण्यात येतात. त्यामुळे गोवा सरकारनेही या दिवशी २४ तासांसाठी कॅसिनोंचे सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. शिवाय या कालावधीत राज्यातील मद्यालयेही बंद राहणार आहेत.
हेही वाचाःPhoto Story | पाटो पणजी येथील ‘ज्ञान सेतू’…

सरकारी पातळीवर कार्यक्रमाचे आयोजन

दरवर्षीप्रमाणे यंदाही सरकारने म. गांधी जयंतीनिमित्त जुने गोवे येथे​ सरकारी पातळीवरील कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तर, सत्ताधारी भाजपने राज्यातील विविध भागांत स्वच्छता मोहिमेसह विविध शिबिरे घेण्याचे निश्चित करून त्याची तयारीही सुरू केलेली आहे.
हेही वाचाःPhoto Story | Navratri Special Day – 5 | हिरवा रंग निसर्गासह पौष्टिक गुण आणि प्रजननक्षमता दर्शवतो…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!