गोवा बागायतदारातील सामान आता वॉट्सअपवर ऑर्डर करा

‘कस्टमर वॉट्सअप गुड्स ऑर्डर स्कीम’ सुरू; 6 ऑगस्टपासून योजनेची सुरुवात

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः कोरोनामुळे जगावर फार विचित्र परिस्थिती ओढवलीये. या महामारीचा समाजावर मोठा परिणाम झालाय. या सगळ्याचा विचार करून सहकारी खरेदी विक्री संस्था मर्यादित गोवा बागायतदार संस्थेने ‘कस्टमर वॉट्सअप गुड्स ऑर्डर स्कीम’ची सुरुवात करत असल्याची घोषणा केली आहे. आता ग्राहकांना वॉट्सवर त्यांना हव्या असलेल्या सामानाची ऑर्डर देता येणार आहे. यामुळे आता बागायतदाराबाहेर होणाऱ्या लोकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवता येईल. तसंच लोकांचा वेळ वाचू शकेल, असं गोवा बागायतदार संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र सावईकर यांनी म्हटलंय.

हेही वाचाः CORONA UPDATE | बरे होणाऱ्यांपेक्षा नवे रुग्ण वाढले

6 ऑगस्टपासून योजनेची सुरुवात

या योजनेची सुरुवात 6 ऑगस्टपासून होणार आहे. प्रत्येक गोवा बागायतदार बाजारासाठी लागणारा वॉट्सअप क्रमांक हा वेगळा असणार आहे. सामानाची ऑर्डर देण्यासाठी गोवा बागायतदारकडून काही नियम आणि अटी ठेवण्यात आल्यात. सामानाची ऑर्डर देताना वॉट्सअपवर वस्तूचं नाव, ब्रॅंडचं नाव, प्रकार, चवीचं, गुणवत्ता इ. अशी तपशीलवार माहिती स्पष्ट द्यावी लागणार आहे. सामानाची यादी ही मोबाईलवर टाईप केलेली किंवा स्वच्छ अक्षरात कागदावर लिहून तिचा फोटो काढून वॉट्सअपवर पाठवावा लागणार आहे. सकाळी 8.30 ते दुपारी 1 या वेळेतच ग्राहकांना सामान ऑर्डर करता येणार असून संध्याकाळी 4.30 ते 5.30 या वेळेत सामान स्थानिक बागायतदारातून घेऊन जावं लागणार आहे. सध्या बागायतदारने होम डिलिव्हरी सेवा सुरू केलेली नाही. घेतलेल्या सामानाचं पेमेंट कॅश किंवा कार्डने करावं लागणार आहे. यातील अतिरिक्त सेवेचा दर 60 रुपये (जीएसटी) लागू असेल. त्याचप्रमाणे या सेवेंतर्गत कमीत कमी 1 हजार रुपयांपर्यंतचंच सामान ऑर्डर करता येणार आहे. फळ-भाज्यांसारख्या वस्तूंच्या ऑर्डर्स या सेवेंतर्गत स्वीकारल्या जाणार नाहीत. तसंच रविवारी कोणत्याची ऑर्डर्स स्वीकारल्या जाणार नाहीत.

‘या’ बागायतदारमधून ऑर्डर करण्यासाठी ‘हा’ असेल वॉट्सअप क्रमांक

फोंडा ( 9699754370)
सदर फोंडा (9699754371)
वाळपई (9699754372)
साखळी (9699754374)
डिचोली (9699754375)
म्हापसा (9699754376)
पर्वरी (9699754378)
माशेल (9699754379)
वास्को (9699754380)
काणकोण (9699754381)
कुंकळ्ळी (9699754382)
मडगाव (9699754383)
आर्ले (9699754384)
शिरोडा (9699754385)
कुडचडे (9699754386)

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!