100 टक्के लसीकरण केलेलं पहिलं राज्य होण्याचं गोव्याचं उद्दिष्ट

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत: प्रत्येकाने लसीकरणासाठी स्वतःहून पुढे यावं

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींचं लसीकरण करणारं देशातील पहिलं राज्य बनण्याचं मिशन सुरू करताना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत शुक्रवारी जनतेला आवाहन केलंय. जनतेने सहकार्य करावं आणि स्वत:च्या लसीकरण करून घेण्यासाठी घराबाहेर पडावं, असं मुख्यमंत्री म्हणालेत. राज्य सरकारने यावर्षी 30 जुलैपर्यंत 18-44 वयोगटातील प्रत्येकाचं लसीकरण करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलं आहे, असं मुख्यमंत्री सावंत म्हणाले. राज्यातील वन खात्याकडून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

हेही वाचाः पेडणेकरांच्या सेवेसाठी मी नेहमीच पुढे असेन

अशी माझी इच्छा…

लसीकरणासाठी पात्र असलेल्या सर्वांनी स्वत:चं लसीकरण करून घ्यावं, अशी माझी इच्छा आहे. राज्याने 30 जुलै 2021 पर्यंत राज्यातील 18 ते 44 वयोगटातील प्रत्येकाचं लसीकरण करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलं आहे. शंभर टक्के लसीकरण (18 वर्षांपेक्षा जास्त असलेल्या लोकांसाठी) करणारं गोवा हे देशातील पहिले राज्य असावं अशी माझी इच्छा आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचाः संरक्षक भिंत स्थानिक मच्छिमारांच्या होड्यांना संरक्षण देण्यासाठी

लसीकरणाची व्याप्ती वाढवली

टप्प्याटप्प्याने लसीकरण करण्यासाठी राज्याने मुलांचे पालक, दिव्यांग, दर्यावर्दी, मोटारसायकल टॅक्सी, आणि रिक्षा चालक यांना सध्या प्राधान्य दिलं आहे. 2 वर्षांहून कमी वयाच्या मुलांचे पालक तसंच को-मॉर्बिटी रुग्णांसाठी आम्ही गुरुवारी लसीकरण सुरू केलं आहे. मी आढावा घेतला होता तेव्हा मला आढळले की या श्रेणीतील केवळ 1,300 लोकांनी स्वत:चं लसीकरण करून घेतलंय. राज्य सरकारने आता लसीकरणाची व्याप्ती वाढवताना पाच वर्षांपर्यंतच्या मुलांच्या पालकांचा या गटात समावेश करण्यात आला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

हेही वाचाः विद्यापीठ, कॉलेज शिक्षकांना कामावर रुजू होण्याचे निर्देश

निर्णय 6 जून रोजी

संचारबंदी कायम ठेवायची की हटवायची, या संबंधी निर्णय घेण्यासाठी 6 जून रोजी मी आढावा बैठक घेणार आहे. संचारबंदी वाढविण्याचा किंवा हटविण्याचा निर्णय घेण्यापूर्वी आम्ही परिस्थितीचा आढावा घेऊ आणि मगच काय ते ठरवू, असं मुख्यमंत्र्यांनी 7 जून रोजी संपणाऱ्या राज्यव्यापी संचारबंदीविषयी बोलताना सांगितलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!