‘आप’ कार्यकर्त्यांनी केक देऊन साजरी केली पक्षांतराची वर्षंपूर्ती

फिलीप नेरीने स्वीकारला केक; विल्फ्रेड डिसाच्या कार्यकर्त्यांची हुज्जत; मोन्सेरात घरात नो एंट्री

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः काँग्रेसमधून भाजपमध्ये उडी मारलेल्या आमदारांच्या पक्षांतराची वर्षंपूर्ती साजरी करण्यासाठी आम आदमी पक्षाने (आप) शनिवारी आगळावेगळा उपक्रम हाती घेतला. पक्ष बदलून भाजपात गेलेल्या आमदारांच्या घरी ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी केक पाठवले. ‘आप’ने ‘चला गोव्यातील राजकारण साफ करुया’ या आपल्या मोहिमेंतर्गत हा उपक्रम हाती घेतला.

काही आमदारांनी स्वीकारले केक, काहींनी घातली हुज्जत

‘आप’ने राबलेल्या या उपक्रमांतर्गत मंत्री मंत्री फिलीप नेरी, विल्फ्रेड डिसा, बाबूश मोन्सेरात, जेनिफर मोन्सेरात इ. आमदारांच्या घरी ‘आप’चे कार्यकर्ते केक घेऊन गेले. पैकी मंत्री फिलीप नेरीने ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी आणलेला हा केक स्वीकारला, तर या प्रकारावर आक्षेप घेत विल्फ्रेड डिसाच्या कार्यकर्त्यांनी ‘आप’च्या कार्यकर्तांशी हुज्जत घातली.

मोन्सेरात दांपत्याच्या घरात नो एंट्री

‘आप’चे नेते वाल्मिकी नाईक आणि सिसिल रॉड्रिग्स यांनी महसूल मंत्री जेनिफर मोन्सेरात आणि बाबूश मोन्सेरात यांनी ताळगाव येथील त्यांच्या घरी जाऊन भेट घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी खास मोन्सेरात दांपत्यासाठी खास चॉकलेट केक नेला होता. मात्र मोन्सेरात दांपत्याने घराचे गेटच उघडले नाही. 

पक्षांतर केलेल्या आमदारांनी केला लोकांचा विश्वासघात

काँग्रेसला मत देणाऱ्या त्या सर्व लोकांना आजचा दिवस आठवण करून देणं गरजेचं आहे. सत्तेची हाव असलेल्या या आमदारांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये उडी मारून लोकांचा विश्वासघात केलाय. आज अशा सर्व आमदारांना आम्ही केक भेट देऊन त्यांच्या पक्षांतराची वर्षंपूर्ती साजरी करणार आहोत, असं सिसिल रॉड्रिग्स म्हणाल्या.

हेही वाचाः गिरी येथे दुकानात चोरी; दोघांना अटक

जुलै 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या काँग्रेसच्या 10 आमदारांपैकी मॉन्सेरात हे एक होत. 2019 पासून काँग्रेसचे सर्व 13 आमदार भाजपमध्ये दाखल झाले आहेत, तर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे दोन आमदारही 2019 मध्ये भाजपमध्ये दाखल झाले होते.

हा व्हिडिओ पहाः Video | FRAUD | मुख्तार ऑटोमोबाईल प्रा. लि.कडून जीएसटी चोरी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!