जमीन रुपांतरणाचा निर्णय खरंच शंकास्पद?, आपचे राहुल म्हांबरे म्हणतात…

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : करोना महामारीमुळे राज्यात पाचशेहून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अलिकडच्या काळात घोटाळ्यांच्या मालिकाच समोर आल्यात. असं असताना भाजप सरकार परिस्थिती सुधारण्याऐवजी भूमी रूपांतरणाचे सर्वेक्षण करण्यात व्यस्त आहे. भू-रूपांतरणचा निर्णय शंकास्पद आहे, अशी टीका आपचे राहुल म्हांबरे यांनी केली आहे.
राहुल म्हांबरे पुढे म्हणतात,
राज्यातील दैनिकांमध्ये जाहीर केलेली अधिसूचना निंदनीय आहे. त्यात जमीन मालकाचे नाव आणि इतर महत्त्वाच्या तपशीलांचा उल्लेख नाही. या सगळ्यात सरकार काहीतरी लपवत आहे. महामारीच्या काळात सरकारने घेतलेला भू-रूपांतरणचा निर्णय शंकास्पद आहे. गेल्या वर्षभरात टीसीपी मंत्र्यांनी भूसंपादनासाठी १००० हून अधिक अर्ज मंजूर केले आहेत. हे करण्यामागे सरकारचा काय हेतू आहे त्याची चौकशी करण्याची नितांत गरज आहे. केंद्र सरकारने कोळसा आणि डबल ट्रॅकिंग प्रकल्प उभारण्यासाठी मोले अभयारण्याच्या हद्दीतील झाडे तोडण्याची मंजुरी दिली दिली. तरीही सावंत सरकारने यावर काहीच भाष्य केले नाही.
राहुल म्हांबरे
हेही वाचा –
काय आहे स्वामित्व योजना? जाणून घ्या प्रॉपर्टी कार्डचा फायदा काय
बापरे! पत्नी आणि मुलीच्या हत्येनंतर त्यांचे 22 तुकडे केले
नया है यह! खाताना मास्क नाही काढायचा फक्त चैन उघडायची