गोवा मुक्तीची सहा गौरवशाली दशके

गोवा माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे संचालक सुधीर केरकरांनी दिलेली माहिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

गोवा हे भारतातील एक लहान राज्य आहे. गोव्याला पोर्तुगीज राजवटीतून १९ डिसेंबर १९६१ रोजी मुक्त झाले आणि आता गोवा राज्य १९ डिसेंबर २०२० ते १९ डिसेंबर २०२१ पर्यंत आपले ६० वे वर्ष साजरे करीत आहे. या महत्त्वपूर्ण प्रसंगाचा शुभारंभ करण्यासाठी राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद १९ डिसेंबर रोजी गोव्यात येत आहेत.

पोर्तुगीजांपासून मुक्ती

१९ डिसेंबर १९६१ साली गोव्याचे पोर्तुगीज गव्हर्नर जनरल मान्यूएल आंतोनियो वासालो सिल्वा यांनी पणजी येथे रात्री ८.३० वाजता आयोजित केलेला औपचारिक समारंभ गोव्यातील तसेच दमण व दीवमधील सर्व पोर्तुगीज सैनिकांना शरण होण्याच्या करारावर सही केल्या आणि शेवटी ४५१ वर्षाच्या पोर्तुगीज राजवटीचा अंत झाला. यामुळे भारतीय भूमीवरील वसाहतवादाचा शेवटचा वेध संपला   आणि भारताचे स्वातंत्र्य पूर्ण झाले. भारताला बिट्रिशांकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १४ वर्षानंतर पोर्तुगीजांना हाकलून देण्यात आले आणि गोवा पोर्तुगीज सत्तेतून मुक्त झाले.

भारतातील परकीय राजवटीचा टप्पा गोव्यात सुरू होऊन त्याचा अंतही गोव्यातच झाला. भारतीय भूमीवर पाय ठेवणारी पाश्चात्य युरोपियन पहिली सत्ता होती. पोर्तुगीज कॉन्कीस्टादोर आफोन्सो दी आल्बुर्केक यांनी २५ नोव्हेंबर १५१० साली गोवा बेट ताब्यात घेतले. (सध्या ते तिसवाडी तालूका म्हणून ओळखतात) मुघल राजवटीचे संस्थापक सम्राट बाबर यांनी २१ एप्रिल १५२६ साली दिल्ली काबीज केले.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की प्लासी लढाईच्या विजयानंतर ब्रिटनची भारतात वास्तविक जोड १५२७ साली सुरू झाली. २०० वर्षानंतर १९४७ त्यांचा शेवट झाला. पोर्तुगीजांनी सर्वात जास्त काळ गोव्याच्या भूमीवर सत्ता केली.

परंतु गोमंतकीयानी कधीही पोर्तुगीजांच्या राजवटीचा स्वीकार केला नाही. पोर्तुगीजांच्या राजवटीविरूध्द अनेक मोठे बंड झाले.

पोर्तुगीजांनी धर्मपरिवर्तन करण्याबरोबरच गोव्याची संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. बाटाबाटीसह लोकांवर आपल्या भाषेची सक्ती करून गोमंतकीयांची ओळख मिटवण्याचा प्रयत्न केला तरीसुध्दा गोव्यातील काही सामाजिक घटक सोडल्यास गोव्यातील लोकांना त्यांच्या या प्रयत्नास यश मिळविण्यास दिले नाही.

देशभरातील लोकांचं योगदान

देशभक्तीसाठी शंभरेक व हजारो स्वातंत्र्य सैनिकांना त्रास सहन करावा लागला. काहींनी अनेक दशेक तुरूंगात काढली. इतरांना तुरूंगवासाच्या भीतीने हद्दपार व्हायला भाग पाडले गेले. घोषणा देणार्‍यांना पोर्तुगालच्या तुरूंगात १५ वर्षे पर्यंत कठोर शिक्षा देण्यात आली. अनेक गोमंतकीय स्वातंत्र्यसैनिकांना तुरूंगवास भोगावा लागला. तुरूंगात त्यांना अनेक याचना, त्रास भोगावे लागले. गोव्याच्या मुक्तीसाठी त्यांच्या त्यागाचे मोठे योगदान आहे. केवळ गोव्याच्या स्वातंत्र्यसैनिकांनीच नव्हे तर देशभरातील देशभक्तांनी १९५४ ते १९५५ पर्यंतच्या सत्याग्रहींनी भाग घेतला. पोर्तुगीज सैनिकांच्या गोळ्यांचा सामना केला परंतु त्यांचे बलिदान आणि त्याग वाया गेला नाही.

सर्वाधिक जीडीपी

१९६१ साली जेव्हा पोर्तुगीज गोवा सोडून गेले तेव्हा गोव्यात थोडेसे उद्योग होते. वैयक्तिक आणि फार्मसी महाविद्यालयाशिवाय गोव्यात उच्च शिक्षण नव्हते. खूप कमी रस्ते तसेच किनारी भागात मोठे पूल नव्हते. पोर्तुगीज नोकर्‍या व्यतिरिक्त कमी प्रमाणात लोह-खनिजशिवाय कोणताही रोजगार नव्हता.  रोजगार शोधणार्‍यांना लोकसंख्येचा एक तृतीयांश लोकांना देशातील इतर भागांत स्थलांतर व्हावे लागत होते. केवळ तीन प्रमुख शहरात वीज होती. ३०% लोक निरिक्षर होते.

आता गोवा राज्याचे दरडोई उत्पन्न सर्वाधिक आहे. गोव्याचा जीएसडीपी सध्या २०११ ते २०१२ आणि २०१७-१८ हा १०.६५ % आहे. देशातील वाहनांची संख्या जास्त आहे. गोव्यात साक्षरतेचे प्रमाणही जास्त आहे. गोव्यात सार्वजनिक आरोग्य केंद्र पध्दत देशात सर्वाधिक आहे.या वर्षी ऑक्टोबर महिन्यात २०२० च्या सार्वजनिक व्यवहार सूचित गोव्याने उत्कृष्ट लहान राज्याचा क्रमांक पटकावलेला आहे. गोव्यात दोन प्रमुख रेल्वे आहेत. दोन राष्ट्रीय महामार्ग आहेत. दाबोळी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून मोपा येथे लवकरच आंतरराष्ट्रीय विमानतळ येत आहे. तसेच गोव्यात प्रमुख बंदरही आहे.

अर्थव्यवस्थेचा कणा

गोव्यात प्रत्येक वर्षी पर्यटकांच्या आगमनात वाढ होत आहे. २०१८ साली गोव्यात सुमारे ७० लाख देशी पर्यटक आणि ९ लाख विदेशी पर्यटक आले होते आणि ही संख्या इतर राज्यांपेक्षा अधिक आहे. पर्यटनाबरोबरच गोव्यातील खाण उद्योग हा अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे. खाण उद्योग सध्याच्या काळात बंद आहे व सरकार तो सुरू करण्यास प्रयत्नशील आहे.

युवकांसाठी खाजगी, सरकारी क्षेत्रात नोकरीची संधी निर्माण करणे हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रमुख प्राधान्य आहे. गोव्यातील नवीन औद्दोगिक क्षेत्रात ८०%  नोकर्‍या स्थानिकांना उपल्बध केल्या पाहिजेत. गुंतवणूकदरांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. चांगल्या आरोग्य सुविधा सुरू करण्यावरही भर देण्यात येतो. गोव्यातील युवकांना रोजगार देणारे उद्योग आणण्यावर भर दिला आहे. त्याच प्रमाणे स्वच्छतेवरही खास भर दिला आहे. आधुनिक कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी पावले उचलली आहे. लोकांना आवश्यक पाणी-पुरवठा व सुरळित वीज-पुरवठा करण्यास सरकारचे दुसरे प्राधान्य आहे.

गोव्याला आरोग्य, शिक्षण अशा क्षेत्रात उत्कृष्ट राज्य करणार्‍यावर सरकारचा भर आहे. लोकांसाठी स्वस्थ वीज, चांगल्या साधन सुविधा, उच्च शिक्षण, उत्कृष्ट आरोग्य सुविधा निर्माण करण्यावर सरकारचा भर आहे. सलोख्याशिवाय शांतता असली पाहिजे आणि शांततेशिवाय प्रगती नाही. गोव्यात धार्मिक विविधता असूनसुध्दा शांतता आहे. गोव्यातील लोक देव-धर्मावर विश्वास ठेवतात. धर्माशी निष्ठावंत राहण्याबरोबरच जातीय सलोखा टिकवून ठेवतात.

फोटोग्राफर नारायण पिसुर्लेकर यांनी टिपलेलं सुधीर केरकर यांचं गोवनवार्ता लाईव्हच्या लॉन्चिग सोहळ्यातील स्मित हास्य

वरील लेख सुधीर केरकर यांनी लिहिलेला असून ते गोवा माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे संचालक आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!