गोवा खाण महामंडळाच्या माध्यमातून 3 लाख लोकांच्या पुनरुज्जीवनासाठी स्पष्ट रोडमॅप तयार करा

जीपीएफचे गोवा सरकारला आवाहन

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः राज्यातील खाण व्यवसायावर अवलंबून असलेल्या गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटने (जीएमपीएफ) गोवा सरकारला ‘गोवा खाण विकास महामंडळ’ची स्पष्ट भूमिका मांडण्याचं आवाहन केले आहे, ज्यामुळे राज्यात खाण व्यवसाय लवकर सुरू होईल आणि रोजगार कसा निर्माण होऊ शकेल. ‘गोवा खाण विकास महामंडळ’ स्थापन करण्यासाठी चालू विधानसभा अधिवेशनात सादर करण्यात आलेल्या विधेयकात गोवा खाण व्यवसायावर अवलंबून असलेल्यांचं पुनरुज्जीवन आणि रोजगार शाश्वत पद्धतीने टिकवून ठेवण्याचा कोणताही हेतू दिसून आला नाही, ही मोठी चिंतेची बाब आहे. खाण व्यवसाय थांबल्यामुळे प्रभावित झालेल्या ३ लाख लोकांच्या उपजीविकेचे विशेषत: पुनरुज्जीवन करण्याचे ध्येय ठेवून स्पष्ट रोड मॅप सादर करण्याची जीपीएफची जोरदार मागणी आहे.

हेही वाचाः आनंदाची बातमी : यावर्षी कला अकादमीच्या भजन स्पर्धा होणार !

अधिकार चुकीच्या हातात घेऊन स्थानिक लोकांचं जबरदस्तीने शोषण होण्याची भीती

जीएमपीएफने अशी भीती व्यक्त केली की नवीन प्रणालीमुळे स्थानिक हितसंबंधांचं संरक्षण करण्यासाठी विधेयकात स्पष्ट हेतू न देता खाण व्यवसायावर अवलंबून असलेल्यांवर अन्याय होईल आणि अन्यथा करार प्रणाली सुरू होऊ शकते, ज्यामुळे राज्याबाहेरील कमी पैशात काम करणाऱ्या मनुष्यबळाची गुंतवणूक आकर्षित होईल किंवा अधिकार चुकीच्या हातात घेऊन स्थानिक लोकांचं जबरदस्तीने शोषण होईल. या संदिग्ध विधेयकामुळे नोकरीची सुरक्षा, टिकाऊपणा आणि चांगल्या मानधनासह कामगारांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या कामगार संघटनांना ठार मारण्यासाठी करार आणि उपकरारची व्यवस्था येण्याची शक्यता आहे.

हेही वाचाः लग्नानंतर शिक्षणासाठी पतीला दिली सोडचिठ्ठी

निर्णय प्रक्रियेत सल्लागार दृष्टीकोनाची जीपीएफची मागणी

कामगार संघटना, ट्रक युनियन्स, बार्ज युनियन्स आणि इतर मित्र संस्थांसारख्या खाण संस्थांच्या प्रतिनिधींसह राज्यात खाणकाम पुन्हा सुरू करण्यासाठी निर्णय प्रक्रियेत सल्लागार दृष्टीकोनाची मागणी जीपीएफने केली आहे. यामुळे लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून योजनांची अंमलबजावणी सुरळीत होईल. हे अत्यंत आवश्यक आहे. कारण असे काही पैलू असू शकतात जे गोव्यात खाणकामाच्या संपूर्ण मूल्य साखळीत महत्त्वपूर्ण रचना असलेल्या स्थानिक भागधारकांच्या हिताच्या विरोधात जाऊ शकतात.

हा व्हिडिओ पहाः Video | Crime | Politics | गोवा सार्व. जुगार दुरुस्ती विधेयक मंजूर


ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!