रणमाले महोत्सवातून वैभवसंपन्न संस्कृतीदर्शन

सुर्ला-सत्तरी येथे रामा धुरी स्मरणार्थ आयोजन : मान्यवरांचा हृद्य सत्कार

Goan Varta Live | प्रतिनिधी

वाळपई : सुर्ला-सत्तरी येथे श्री सातेरी केळबाय शांतादुर्गा देवस्थानच्या प्रांगणात आयोजित दहाव्या रणमाले महोत्सवात पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडले. ग्रामीण कला आणि सांस्कृतिक संस्था सावर्शे आणि सुर्ला देवस्थान समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. रामा धुरी यांच्या स्मरणार्थ हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. गावचे ज्येष्ठ रणमाले कलाकार पांडुरंग हेमा गांवकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष म्हणून डॉ. रघुनाथ धुरी, कला आणि संस्कृती खात्याचे उपसंचालक अशोक परब, सन्माननीय पाहुणे म्हणून डोंगुर्ली ठाणेच्या सरपंच प्रजिता गावस, उपसरपंच सूर्यकांत गांवकर, देवस्थानचे अध्यक्ष गणू गांवकर, ग्रामीण कला व सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष झिलू गांवकर व सचिव कृष्णा गांवस उपस्थित होते.

हेही वाचाः Video | श्रीपाद नाईक यांना अखेर डिस्चार्ज

तिघांचा सत्कार

या प्रसंगी ‘गोवन वार्ता’चे संपादक पांडुरंग गांवकर, गावचे मार्गदर्शक लक्ष्मण गांवकर व लोकगीत कलाकार श्रीमती लक्ष्मी नागेश झर्मेकर यांचा डॉ. धुरी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह प्रदान करून सत्कार करण्यात आला.

हेही पहाः 108 AMBULENCE I १०८ नंबर डायल करता महाराष्ट्रात लागतो फोन!

कलेसाठी साह्य

सत्तरी तालुक्यात रणमाले पथकांना राष्ट्रीय पातळीवर कला सादर करण्याची संधी कला व संस्कृती खात्यामार्फत दिली जाणार आहे. या जुन्या कलेचं संवर्धन होण्यासाठी आर्थिक मदतही दिली जाईल, असं आश्वासन यावेळी उपसंचालक अशोक परब यांनी यावेळी बोलताना दिलं.

हेही वाचाः गोव्यातून सिंधुदुर्गात जाताय? कोरोना चाचणी करावी लागणार

कलाकारांना व्यासपीठ

ग्रामीण कला संस्था रणमालेसारख्या कलाकारांना व्यासपीठ देण्याचं महत्त्वाचं काम गेली दहा वर्षं महोत्सवाच्या माध्यमातून करत आहे, हे कार्य प्रशंसनीय आहे, असं सरपंच प्रणिता गावस म्हणाल्या. या महोत्सवात सालेली, सुर्ला, पारवड व कणकुंबी या पथकांनी रणमाले सादर केले. गौरवमूर्तींची ओळख अंकुश धुरी यांनी करून दिली. स्वागत प्रकाश गांवकर; तर रणमाले सत्राचे सूत्रनिवेदन सुभाष गावस यांनी केलं. झिलू गांवकर यांनी प्रास्ताविक केलं. कृष्णा गांवस यांनी आभार मानले.

रणमाले सादर करताना सुर्लाचे पथक

निसर्ग रक्षणासाठी एकत्र या!

या प्रसंगी डॉ. रघुनाथ धुरी म्हणाले, पारंपरिक कलेबरोबरच निसर्गाचे रक्षण करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येण्याची गरज आहे. नाहीतर सुंदर अशा निसर्गाने नटलेल्या सुर्ला गावचं तसंच सभोवतालच्या नयनरम्य निर्सगाचं काँक्रिटचं जंगल होण्यास वेळ लागणार नाही. विकासाच्या नावाने दुष्ट नजर असणार्‍या लोकांपासून सावध राहण्याची आज गरज आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!