कसिनो खुले करणे करोनाच्या तिसऱ्या लाटेस आमंत्रण ठरेल

गोवा युवक काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजीः राजधानी पणजीतील पंचतारांकित जुगार असलेल्या कसिनोंचे व्यवहार सुरू करणे हे तिसऱ्या करोना लाटेस पुन्हा आमंत्रण देणे ठरेल. त्यामुळे मांडवी नदी पात्रातील कसिनो बोटी खुल्या करण्यास करोना साथीच्या काळात परवानगी देऊ नये, असे लेखी निवेदन गोवा युवक काँग्रेसने राज्यपाल पी. एस. श्रीधरन यांना आज दिले. गोवा युवक काँग्रेस अध्यक्ष वरद मार्दोळकर व एनएसयुआय प्रभारी जनार्दन भंडारी यांनी हे निवेदन आज राज्यपालांना सादर केले.

हेही वाचाः कोविडनंतर आता गोव्यात डेंग्यू, मलेरियाचा धोका; सरकार पुन्हा निद्रस्त!

कोविड काळात मांडवीतील प्रदूषण झालं कमी

या निवेदनात युवक काँग्रेसने म्हटले आहे की, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या अहवालानुसार कोविड काळात मांडवी नदीतील मानवी हस्तक्षेप तसेच जहाजांची ये जा थांबल्याने पाणी प्रदूषणात घट झाली आहे.

कोविड निर्बंधांचे कसिनोत सर्रास उल्लंघन होते

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, राज्यातील कोविड संसर्ग वाढण्यास याआधीच्या काळात पर्यटकांबाबत सरकारचा बेजबाबदारपणा कारण ठरला होता. हे लक्षात न घेता कसिनोंना व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली तर पुन्हा कोविड संसर्गाचे प्रमाण वाढून राज्यात तिसरी लाट येऊ शकते. कारण कसिनोतील कर्मचारी करोना बाधित झाल्यामुळे त्याची लागण अनेक पर्यटकांना झाली होती. सरकारने जाहीर केलेल्या कोविड निर्बंधांचे कसिनोत सर्रास उल्लंघन होते. तसेच कसिनो खुले केल्यास मांडवीतील प्रदूषण वाढेल आणि राजधानीत रोगराई पसरेल हा धोका आहे.

हेही वाचाः ROBBERY | उत्तर गोव्यात कार फोडून स्टेरिओ चोरणाऱ्यांचा धुमाकूळ

गोवा युवक काँग्रेसची ही मागणी आहे की, चतुर्थी, दीपावली, ख्रिसमस, नवीन वर्ष साजरे करेपर्यंत कसिनो बंदच ठेवणे गरजेचे आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!