थेट झाडावर लावला इंटरनेट wifi! जीआयटीपीचा स्तुत्य उपक्रम

अशी शक्कल सरकारी यंत्रणेला लढवता आली असती तर...?

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

सत्तरी : जीआयटीपी म्हणजेच गोवा इनफॉरमेशन टेक्नॉलॉजी प्रोफेशनल्स यांनी एक स्तुत्य काम केलंय. सत्तरीमध्ये असणाऱ्या एका गावामध्ये त्यांनी थ्री जी आणि फोर जी इंटरनेट राऊटर लावलेत. पाली सत्तरीत दहावीच्या एका विद्यार्थ्याने 15 ऑक्टोबर रोजी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर जीआयटीपीनं उचललेलं पाऊल खऱ्या अर्थानं कौतुकास्पद आहे.

सत्तरीतील अनेक गावांना नेटवर्कची समस्या भेडसावते आहेत. सध्या कोरोनामुळे या गावातील विद्यार्थ्यांना मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागतं. मोबाईलला नेटवर्क नसल्यामुळे या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाचे तीन तेरा वाजत असल्याचं जीआयटीपीच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं. या गावातील विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या हेतून जीआयटीपीनं अनोखं पाऊल उचललंय.

सरकारी मदतीची वाट न बघता जीआयटीपीच्या कार्यकर्त्यांनी शक्कल लढवली. या विद्यार्थ्यांना नेटवर्कची समस्या उद्भवू नये म्हणून थेट घराजवळच्या झाडावर थ्री जी आणि फोरजीचे राऊटर कॉनफिगर केलेत. नेटवर्क नसल्यामुळे या मुलांना घरातून दूर कुठेतरी नेटवर्क शोधावं लागतं होतं. जिथे नेटवर्क मिळेल, त्या ठिकाणी या गावांमधली मुलं थांबायची आणि तिथेच भरायचा मुलांचा ऑनलाईन वर्ग. मात्र जीआयटीपीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग करत या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या आड येणारा मोठा अडथळा दूर केलाय.

GITP recently helped a family in remote village in Sattari setup and configure a 3G/4G router. As the Mobile network is…

Posted by Goa Information Technology Professionals – GITP on Saturday, 17 October 2020

सरकारवर निशाणा

गोवा सरकारवर जीआयटीपीने खोचक शब्दांत टीका करत आपण केलेल्या कामाची माहिती फेसबूकवरुन दिली आहे. सरकार आपल्या पॉलिसी बनवण्यात दंग असताना गावागावातील विद्यार्थ्यांसाठी थेट कुणीच काही उपाययोजना करत नसल्याचं जीआयटीपीने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटलंय.

जीआयटीपी काय आहे?

जीआयटीपी हा गोव्यातील आयटी क्षेत्राशी संबंधित असलेल्या लोकांचा एक समूह आहे. गोव्यात काम करणारी आयटी क्षेत्राशी संबंधित अनेकजण या समुहाचा भाग आहेत. गोव्याला सक्षम बनवण्यासाठी आपल्यापरीने काम करणारा हा ग्रूप असून त्यांचा हेतू अराजकीय आहे.

हेही वाचा – दहावीच्या मुलाने आत्महत्या केल्याचं कारण हारदवून टाकणारं आहे!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!