‘काणकोण धरणावरील अश्लिल व्हिडीयोतून सिद्ध झालं भाजपा पोर्न माफियाला प्रोत्साहन देतंय’

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकरांचा आरोप

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव : एक व्हिडीओ व्हायरल झालाय. व्हिडीओ अश्लिल आहे. काणकोणच्या धरणावर शूट झाल्याचं बोललं जातंय. एका मॉडेलनं नग्न अवस्थेत अश्लिल व्हिडीओ शूट केलाय. हा व्हिडीओ अनेकांच्या व्हॉट्सअपवर येऊन धडकलेला आहेच. या प्रकरणावरुन काँग्रेसने भाजपवर निशाणा साधलाय.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सरकारवर टीका केली आहे. काणकोण येथील धरणावर चित्रीकरण केलेला एका मॉडेलचा अत्यंत अश्लील व्हिडीयो सोशल मीडियावर फिरत असून, या प्रकरणानं गोमंतकीयांना परत एकदा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने लाजेने मान खाली घालायला लावली आहे. मुख्यमंत्र्यानी ताबडतोब याची दखल घेऊन कारवाई न केल्यास महिलांच्या सन्मानासाठी कॉंग्रेस पक्षाला परत एकदा रस्त्यावर यावं लागेल, असा इशारा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिलाय.

भाजप पॉर्न माफिया?

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षततेखालील गोव्यातील सर्व चित्रीकरणांसाठी परवानगी देणाऱ्या गोवा मनोरंजन संस्थेने सदर मॉडेलने जवळजवळ नग्नावस्थेत केलेल्या अश्लिल चित्रीकरणासाठी कशी परवानगी दिली, असा प्रश्न गिरीश चोडणकर यांनी विचालया. मर्डर माफिया, ड्रग्स माफिया, भिकारी माफिया नंतर आता भाजप सरकार पोर्न माफियाला प्रोत्साहन देत असल्याचे उघड झालंय, असा दावा गिरीश चोडणकर यांनी केलाय.

चोडणकर म्हणतात की…

काणकोणच्या नागरीकांकडून मला अनेक फोन आले. काणकोणच्या धरणावर दिवसा उजेडा चित्रीकरण केलेल्या या व्हिडीयोने काणकोणकरांना लाजेने मान खाली घालावी लागली आहे.

सरकारने ताबडतोब या प्रकाराची चौकशी करुन जबाबदार असलेल्यांवर ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी गिरीश चोडणकर यांनी केली आहे.

हेही वाचा –

‘नो शर्ट फ्री बिअर’ ऑफर महिलांना देणारा बार भाजप कार्यकर्त्यांनी शोधला!

EXCLUSIVE STORY | धारगळ बनणार पंचतारांकित डेस्टीनेशन

‘पवार’फुल्ल भेट! कामत शरद पवारांना भेटले, भेटीत ‘चाय पे चर्चा’

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!