प्राॅफिलेक्सिस ट्रीटमेंट हा भाजपचा नवा ‘जुमला’

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी कोविड उपचारासाठी नुकतीच 18 वर्षांवरील रूग्णांसाठी प्राॅफिलेक्सिस ट्रीटमेंटची घोषणा केलीय. मात्र या उपचारपध्दतीला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. हा भाजपचा नवा जुमला असल्याचा गंभीर आरोप गोवा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केलाय.
कोरोना उपचारात 18 वर्षांवरील रूग्णांवर प्राॅफिलेक्सिस ट्रीटमेंट करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केली होती. यात इव्हरमॅक्सीन टॅबलेट्सचा वापर करण्यात येतो. दरम्यान, गिरीश चोडणकर यांनी यावर जोरदार आक्षेप घेतला आहे. इव्हरमॅक्सीन टॅबलेटच्या वापराचे वैज्ञानिक पुरावे आपल्याकडं आहेत का? जागतिक आरोग्य संघटनेनं याला मान्यता दिल्याचे पुरावे आपल्याकडं आहेत का? असे सवाल त्यांनी उपस्थित केलेत. त्याचबरोबर हा भाजपचा नवा जुमला असुन यातुन पैसे कमावण्याचा भाजपचा हेतु आहे का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. या उपचारपध्दतीबाबत सविस्तर माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्यामुळं दिशाभुल न करता सरकारनं या उपचारपध्दतीबाबतचं सत्य लोकांसमोर आणावं, असही आवाहन गिरीष चोडणकर यांनी केलंय.