गोव्याला आणखी २५० इलेक्ट्रिक बसेसची भेट…

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची हमी; माविन गुदिन्होंची माहिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : गोव्याला आणखी २५० इले​क्ट्रिक बसेस देण्यासह राष्ट्रीय महामार्ग १७ ‘ब’वर दाबोळी विमानतळ ते वेर्णा जंक्शन दरम्यान सुमारे ५०० कोटींचा उड्डाणपूल बांधून देण्याची हमी केंद्रीय रस्ते आणि महामार्ग तसेच वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्याला दिलेली आहे, अशी माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
हेही वाचाःगांजा पोलीस स्थानकात आलाच नाही, गहाळ गांजाचा शोध सुरू…

वाहतूक खात्याशी संबंधित विविध विषयांवर चर्चा

गोव्यात चार दिवसांच्या खासगी दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची शनिवारी मंत्री माविन गुदिन्हो यांनी भेट घेतली आणि त्यांच्याशी वाहतूक खात्याशी संबंधित विविध विषयांवर चर्चा केली. वाहतूक संचालक राजन सातार्डेकर तसेच कदंबा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डेरिक नेटोही त्यांच्यासमवेत उपस्थित होते.       
हेही वाचाःGoa Crime News : वास्कोत आढळलं ‘नवजात अर्भक’…     

सध्या ५० इलेक्ट्रिक बसेस कार्यान्वित

गोवा पर्यटन राज्य असल्यामुळे राज्यात दरवर्षी देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होत असतात. त्यांच्या वाहतुकीसाठी आवश्यक त्या साधनसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्राने मदत करावी अशी मागणी आपण गडकरी यांच्याकडे केलेली होती. त्यानुसार पर्यटन राज्य असल्याने गोव्याला स्वतंत्र योजना राबवून आणखी २५० इलेक्ट्रिक बसेस देण्याची हमी त्यांनी आम्हाला दिलेली आहे, असे गुदिन्हो म्हणाले. राज्यात सध्या ५० इलेक्ट्रिक बसेस कार्यान्वित आहेत. येत्या मार्चपर्यंत कदंबा महामंडळाच्या ताफ्यात आणखी १५० बसेस दाखल होणार आहेत. या व्यतिरिक्त आणखी २५० बसेस देण्याची ग्वाही गडकरी यांनी दिलेली आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांत गोव्यात सुमारे ४०० इलेक्ट्रिक बसेस असतील. या सर्व बसेस रस्त्यांवर उतरल्यानंतर सरकारचा इंधनाचा खर्च वाढणार असून, तिकिटांच्या दरांतही घट होणार आहे, असे मंत्री गुदिन्हो म्हणाले.             
हेही वाचाःमित्तल, अदानीसह २४ कंपन्यांचा खाण लिलाव परिषदेत सहभाग…

डिझेलवर चालणाऱ्या अनेक बसेसची अवस्था बिकट

कदंब महामंडळाकडे सध्या डिझेलवर चालणाऱ्या ज्या बसेस आहेत, त्यातील अनेक बसेसची अवस्था बिकट आहे. त्यांच्याजागी नव्या बसेस आणण्यासाठीचा खर्चही मोठा आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने गोव्याला इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा केल्यास राज्याला त्याचा मोठा फायदा होईल. या बसेसमुळे इंधनाचा खर्च वाचेल, असे ते म्हणाले. मंत्री गडकरी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार सुमारे ४०० इलेक्ट्रिक बसेस गोव्यातील रस्त्यांवर धावू लागल्यास प्रवाशांच्या तिकिटदरातही घट होईल. या बसेसचा पर्यटनासाठी राज्यात येणाऱ्या पर्यटकांनाही फायदा होईल, असे त्यांनी सांगितले.       
हेही वाचाःम्हापशात पिता-पुत्रावर खुनी हल्ला…      

सुमारे ५०० कोटींचा उड्डाणपूल बांधून देण्याची हमी

दरम्यान, वाढत्या पर्यटकांमुळे गोव्यात पायाभूत साधनसुविधांत वाढ करून पर्यटकांना दर्जेदार सुविधा मिळवून देणे गरजेचे आहे. त्यासाठीच आपण मंत्री​ नितीन गडकरी यांच्याकडे दाबोळी विमानतळ जंक्शन ते वेर्णा जंक्शनपर्यंत उड्डाणपूल बांधून देण्याची मागणी केलेली आहे. या अपेक्षित आहे. आपल्या मागणीची दखल घेऊन पुढील एका महिन्यात या प्रकल्पाचा डीपीआर तयार करून दोन महिन्यांत कामाच्या निविदा जारी करण्याचा आणि त्यानंतर लगेचच उड्डाणपुलाचे काम सुरू करण्याचा संकल्प गडकरी यांनी केलेला आहे, असेही मंत्री गुदिन्हो यांनी नमूद केले.   
हेही वाचाःखासदार मोईत्रा यांनी मानले केंद्र सरकारचे आभार…

बसस्थानकांचाही होणार कायापालट!  

पणजी, म्हापसा, मडगावसह राज्यातील सर्वच ठिकाणच्या बसस्थानकांना नवी झळाळी देऊन आणि तेथे आर्थिक उपक्रमांना चालना देऊन अधिकाधिक महसूल जमवण्याचा विचार राज्य सरकारने चालवला आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याशी चर्चा केली असता, केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त सहकार्याने सर्वच बसस्थानके दर्जेदार करण्याची हमीही त्यांनी दिलेली आहे, असेही मंत्री मा​विन गुदिन्हो यांनी सांगितले.  
हेही वाचाःधालो-फुगडी महोत्सवाचे आयोजन, मागवल्या प्रवेशिका…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!