फेणी, खाजे, मिरचीसाठी ‘जीआय’ प्रक्रिया

मुख्यमंत्री डॉ. सावंत : वाणिज्य उत्सवाचे दिमाखात उद्घाटन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: सरकार गोव्याच्या अधिक उत्पादनांसाठी भौगोलिक संकेत (जीआय) टॅग मिळवण्याचं काम करीत आहे ज्यामुळे ‘फेणी’ आणि ‘खाजे’ यांसारख्या उत्पादन व्यवसायात गुंतलेल्या गोवा उद्योजकांना तसेच ‘खोला मिरची’ उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना बौद्धिक संपदा मिळवण्याचे अधिकार मिळतील आणि आंतरराष्ट्रीय बाजारात गोवा उत्पादनांच्या सत्यतेची हमी मिळेल अशा प्रकारे या वस्तूंसाठी निर्यात मार्ग उघडतील. तसेच यामुळे गोव्यातील अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी दोनापावल येथील गोवा इंटरनॅशनल सेंटरमध्ये ‘वाणिज्य उत्सव’ चे उद्घाटन केल्यानंतर केलं.

राज्यातील काही प्रमुख निर्यातदारांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी तसंच उद्योगपतींना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी कॉटन टेक्सटाईल एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलच्या सहकार्याने भारत सरकारच्या वाणिज्य खात्याने आणि राज्य उद्योग खाते यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वाणिज्य उत्सव’ आयोजित केला होता. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांची आठवण म्हणून साजरा होणारा उत्सव ‘आझादी का अमृत महोत्सव’ चा भाग म्हणून कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण सीमाशुल्क आणि परराष्ट्र व्यापार महासंचालनालयासारख्या विविध निर्यात संबंधित सरकारी संस्थांशी राज्य संवाद साधणार आहे.

पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी नवीन संधी शोधून आणि नवीन बाजारपेठेत प्रवेश करून गोव्याची निर्यात क्षमता वाढवण्याचे ध्येय निश्चित केले जात असल्याचं सांगितलं. आम्ही भारतातील सर्वात लहान राज्य असल्याने आमच्या लहान लोकसंख्येमुळे आणि जमिनीच्या उपलब्धतेसारख्या मर्यादित नैसर्गिक संसाधनांमुळे आम्हाला विकासाच्या अनोखी आव्हानाना तोंड द्यावं लागतं, असं त्यांनी सांगितलं आणि गोव्याला निर्यात केंद्र बनविण्यासाठी हातात हात घालून काम करण्याचं आवाहन त्यांनी केलं.

डॉ. सावंत पुढे म्हणाले, नीती आयोगाच्या शाश्वत विकास ध्येयांवर (एसडीजी) गोव्याची स्थिती सुधारण्यासाठी आमच्या राज्य सरकारने १६ खात्यांना एसडीजी सेल्सची स्थापना करण्यासाठीच्या उद्देशाकडे वाटचाल करण्यास सांगितले आहे. गोवा एसडीजी इंडिया इंडेक्समध्ये २०१९ पासून ७व्या स्थानावरून २०२० मध्ये तिसऱ्या स्थानावर गेला आहे हे जाणून तुम्हाला आनंद होईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, आरोग्यमंत्री यांनीही मनोगत व्यक्त केले. टेक्सप्रोसिलचे अध्यक्ष मनोज पाटोडिया यांनी स्वागत केले तर उद्योग, व्यापार आणि वाणिज्य खात्याचे संचालक श्वेतिका सचन, आयएएस यांनी आभार मानले. सुभाष जाण यांनी सूत्रसंचालन केलं.

मुख्यमंत्री म्हणाले…

– मोपा ग्रीनफिल्ड विमानतळाचे बांधकाम जोरात सुरू आहे आणि ऑगस्ट २०२२ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती देत लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्यासाठी सरकार कठोर परिश्रम करीत आहे.
– उत्तर आणि दक्षिण गोव्याला जोडणाऱ्या झुआरी पुलाचे काम पूर्ण होईल ज्याचे उद्घाटन काही महिन्यांत होईल त्यामुळे राज्यातील कनेक्टिव्हिटी आणखी वाढेल.
– राज्य भात, भाजीपाला, फळे, खाद्य प्रक्रिया, कॉयर, मिरची आणि गूळ यांसाठी स्फूर्ती योजनेअंतर्गत सामान्य प्रक्रिया क्लस्टर घेऊन येत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!