घन:श्याम शिरोडकरांविरोधात अविश्वास ठराव संमत…

15 विरुद्ध शून्य मतांनी अविश्वास ठराव संमत

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव : मडगावचे नगराध्यक्ष घनःश्याम शिरोडकरांविरोधात आणलेला अविश्वास ठराव शुक्रवारी 15 विरुद्ध शून्य मतांनी संमत झाला. हा ठराव मतदानास आला असता भाजपच्या 15 नगरसेवकांनी हात वर काढून या ठरावाला मंजुरी दिली. अविश्वास ठराव संमत झाल्यानंतर नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी दिगंबर कामतांची भेट घेतली. यामुळे कामतांनी मडगाव नगरपालिकेवर पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलंय.
हेही वाचाःAccident | अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू…

अविश्वास ठराव 15 विरुद्ध शून्य मतांनी संमत झाला

मडगाव नगरपालिकेत मागचे काही दिवस सुरू असलेल्या सत्ता नाट्याला अखेर शुक्रवारी पूर्णविराम मिळाला. मडगावचे नगराध्यक्ष घनःश्याम शिरोडकरांविरोधात आणलेला अविश्वास ठराव शुक्रवारी 15 विरुद्ध शून्य मतांनी संमत झाला. हा ठराव मतदानास आला असता भाजपच्या 15 नगरसेवकांनी हात वर काढून या ठरावाला मंजुरी दिली. मडगावचे नगराध्यक्ष घनःश्‍याम शिरोडकरांनी अविश्‍वास ठराव मतदानापूर्वीच गुरुवारी राजीनामा दिला. अविश्‍वास ठरावावर चर्चा करून नंतर मतदानासाठी शुक्रवारी सकाळी 11 वाजता बैठक बोलावली होती. यावेळी हात दाखवून उघडपणे मतदान होणार होतं. त्यामुळे भाजपच्या कोणत्याच नगरसेवकाने घनःश्‍याम यांच्या बाजुने मतदान केलं नसतं.
हेही वाचाःAccident | कदंब बसच्या धडकेत सायकलस्वाराचा बळी…

कामतांनी नगरपालिकेवर पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलंय

संख्याबळाचं गणित जुळत नसल्यानं त्यांनी बैठकीच्या पूर्वसंध्येलाच राजीनामा नगरपालिका प्रशासन संचालकांकडे पाठवला. मागच्या निवडणुकीत भाजप नगरसेवकांनी क्रॉस मतदान केल्यानं यापुढे हात दाखवून उघडपणे निर्णय घेण्यास निर्वाचन अधिकारी सांगतील, अशी व्युवरचना करण्यात आली. ठरल्याप्रमाणे भाजपच्या 15 नगरसेवकांनी हात वर काढून या ठरावाला मंजुरी दिली. अविश्वास ठराव संमत झाल्यानंतर नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी दिगंबर कामतांची भेट घेतली. यामुळे कामतांनी मडगाव नगरपालिकेवर पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलंय.
हेही वाचाःकोलवाळमध्ये १.८२ किलो ग्रॅम गांजा जप्त…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!