गोवा फॉरवर्ड अध्यक्षांच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून राज्यात चित्रिकरणावर बंदी

राज्यात करोना वाढत असताना शूटिंग सुरू ठेवण्यावरून सरकारवर टीका

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव: येथील रवींद्र भवनच्या सभागृहात ‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमाचं शूटिंग सुरू आहे. शूटिंगपूर्वी या टीमने प्रशासनाकडून योग्य ती परवानगी घेतली आहे. शूटिंगवेळी प्रेक्षकही नव्हते. असं असतानाही गोवा फॉरवर्डच्या अध्यक्षांनी रवींद्र भवनातील सेटवर जाऊन शूटिंग न थांबवल्यास ते बंद पाडण्याचा इशारा दिला. राज्यात करोना वाढत असताना शूटिंग सुरू ठेवण्यावरून त्यांनी सरकारवर टीका केली.

दामू नाईकांची गोवा फॉरवर्डवर टीका

याबाबत रवींद्र भवनचे अध्यक्ष दामू नाईक म्हणाले, कार्यक्रमाचे शूटिंग सर्व परवानगी घेऊन सुरू आहे. कुणाला आक्षेप होता तर प्रशासनाकडे तक्रारी करायच्या होत्या. सेटवर जाऊन गुंडगिरी करण्याची व गोव्याची प्रतिमा मलिन करण्याची गरज नव्हती. अशा असंस्कृत वागण्यामुळे गोव्याचं नाव बदनाम होतं. पालिका निवडणुकांतील फातोर्ड्यातील हार पचवता न आल्यानं ते वैफल्पग्रस्त झाल्याची प्रतिक्रिया नाईक यांनी दिली.

राज्यात गुरुवारपासून चित्रीकरणास बंदी

बुधवारी रवींद्र भवनात गोवा फॉरवर्डच्या नेत्यांनी जाऊन शूटिंग बंद पाडण्याचा इशारा दिल्यामुळे सरकारने राज्यातील चित्रीकरणावर बंदी आणण्याचा निर्णय घेतलाय. कोव्हिडच्या वाढत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा मनोरंजन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन राज्यात सुरू असलेलं चित्रीकरण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीला मुख्य सचिव, गोवा मनोरंजन संस्थेचे मुख्य अधिकारी आणि उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई उपस्थित होते.

बेकायदेशीर चित्रीकरण करणाऱ्यांवर करणार गंभीर कारवाई

राज्यात चित्रपट आणि कार्यक्रमांचं चित्रीकरण माठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यावर ताबडतोव बंदी आणण्याचा निर्णय सदर बैठकीत घेण्यात आला आहे. आता कोणालाही चित्रीकरणासाठी परवानगी दिली जाणार नाही आणि परवानगीशिवाय चित्रीकरण केल्याचं आढळून आल्यास संबंधितांवर गंभीर करवाई केली जाईल, असा इशारा राज्यात गुरुवारपासून चित्रीकरणास बंदी मुख्यमंत्री सावंत यांनी दिला आहे.

800x450 cm govt servent

सोशल मिडीयावरीर व्हिडिओमुळे प्रकरण समोर

गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार रामा काणकोणकर यांनी एका तरांकित हॉटेलमध्ये खुलेआम चित्रीकरण केलं जात असल्याचं सोशल मिडीयावर व्हायरल केलेल्या व्हिडीओत म्हटलं होतं. त्या प्रकरणाची आम्ही शहानिशा केली असून ते चित्रिकरण पूर्णपणे बेकायदेशीर आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!